सविंदणे गावच्या उपसरपंचपदी ऍड. भोलेनाथ पडवळ 

महाराष्ट्र शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथिल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ऍड. भोलेनाथ पडवळ यांची निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच भाऊसाहेब लंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी ईश्वर पडवळ व भोलेनाथ पडवळ यांचा ऊपसरपंचपदासाठी अर्ज आल्याने झालेल्या गुप्त मतदानात भोलेनाथ पडवळ यांना ७/३ असे मतदान झाल्याने त्यांची ऊपसरपंचपदी निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी ग्रामसेवक हनुमंत चव्हाण यांनी जाहीर केले. त्यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नुतन ऊपसरपंच भोलेनाथ पडवळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

सविंदणे गावामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता असून मी वसंतशेठ पडवळ यांच्याच नेतृत्वाखाली गावचा विकास करण्यास कटिबद्ध असल्याचे भोलेनाथ पडवळ यांनी सांगितले आहे. आम्ही सगळे एक असून या निवडीत फक्त थोडासा क्रम बदलला आहे. सगळ्यांनाच संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर सह. कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील, भिमाशंकर सह. कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, डॉ. सुभाष पोकळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी सरपंच शुभांगी पडवळ, माजी सरपंच सोनाली खैरे, माजी उपसरपंच भाऊसाहेब लंघे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा नरवडे, नंदा पुंडे, मालूबाई मिंडे, रवींद्र पडवळ, ईश्वर पडवळ, गोरक्ष लंघे व सविंदणे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.