manoj-jarange-shirur
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून आरक्षण आपण आता घेतल्यात जमा आहे. या दृष्टीने सकल मराठी समाजाने मुंबईकडे कुच केली असून आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. कारण युद्ध लढाव मराठ्यांनीच आणि जिंकाव पण मराठ्यांनीच असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
सोमवार (दि 22) रोजी कारेगाव येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेची नियोजित वेळ सायंकाळची होती. परंतु मनोज जरांगे हे नगरमार्गे शिरुरकडे रस्त्यात येताना गावोगावी त्यांचे नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यामुळे कारेगाव येथे मंगळवार (दि 23) रोजी पहाटे अडीच वाजता त्यांचे आगमन झाले. परंतु कडाक्याच्या थंडीतही लाखों लोकांनी त्यांच्या सभेला गर्दी केली होती.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की देव आडवा आला तरी ओबीसीतून आरक्षण घेणारच. प्रत्येक वेळी सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. पहिल्यांदाच मराठ्यांमध्ये एकजूट झाली आहे. यातही फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु असुन यासाठी काहीजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. त्यामुळे मराठ्यांची पुढे अशीच एकी राहिली तर जगामध्ये मराठा समाज प्रगत म्हणून पुढे येईल. शिक्षण व नोकरीमध्ये आपला टक्का वाढला पाहिजे.
अनेक राजकीय पक्षाचे नेते आपण मोठे केले. परंतु आज एकही नेता आरक्षणाच्या बाजूने बोलायला तयार नाही. आमच्या आरक्षणाच्या आड जर हे नेते आले. तर त्यांचा राजकीय सुपडा साफ करु असाही इशारा जरांगे यांनी दिला. तसेच मी मॅनेज होत नाही हीच सरकार पुढे खरी डोकेदुखी आहे. मराठा आरक्षणा संदर्भात माझ्यासोबत वेगवेगळ्या मंत्र्यांच्या तब्बल 27 ते 28 बैठका झाल्या. परंतु एकदा आलेला मंत्री परत पुन्हा येतच नाही असेही ते म्हणाले.
पुणे-नगर रस्त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल
पुणे-नगर रस्त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल
जालना: कचरा वेचक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खांद्यावर मोठी गोणी घेऊन रस्त्यावर फिरणारी व्यक्ती येते.…
ऍलर्जीक खोकला ही अत्यंत थकवा आणणारी स्थिती आहे. घशात जळजळ होते, रात्री वाढते आणि दैनंदिन…
भारतात आरोग्याबाबत चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. देशात असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत असून त्याचा धोकाही…
मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…
मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…