sanaswadi-strike

सणसवाडीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा…

शिरूर तालुका

कोरेगाव भीमा: सणसवाडी (ता. शिरूर) येथे मराठा आरक्षणासाठी शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी असणाऱ्या सणसवाडी गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार (ता.३०) पासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आले आहे.

समस्त ग्रामस्थ सणसवाडी यांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी अंतरवाली येथे मनोज जारंगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने ३०/१०/२३ रोजी ग्रामस्थ सकाळी ९ ते ५ या वेळेत साखळी पद्धतीने उपोषण करण्यात येत आहे. यावेळी अंदोलकांकडून मराठा समाजातील बांधवांना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, आपण पद बाजूला ठेऊन उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय हरगुडे सणसवाडी गावच्या सरपंच सुवर्णा दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, सागर दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, माजी उपसरपंच बाबा दरेकर, सुदीप गुंदेचा, माऊली थेऊरकर, गोरक्ष भुजबळ, सुरेश हरगुडे, आदिनाथ हरगुडे, भैरवनाथ दरेकर, विद्याधर दरेकर, काळुराम दरेकर, नवनाथ हरगुडे, सुभाष दरेकर, विठ्ठल दरेकर, संतोष शेळके, सागर हरगुडे, बाळकृष्ण दरेकर, गोविंद मोरे, बाळासाहेब मोरे, आण्णा हरगुडे, सुनिल भोसुरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

पोरींनो बाप आभाळ आहे ते कुठेही झुकता कामा नये…

वाघोलीतील लॉजवर प्रेमीयुगुलाची गळफास घेत आत्महत्या…

कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता…

रोहित पवार यांना तळेगाव ढमढेरेमध्ये थांबू दिले नाही; कारण…

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!