Manoj Jarange Patil

सोशल मीडियावर व्हायरल मेसेजबाबत जरांगे पाटील म्हणाले…

महाराष्ट्र मुख्य बातम्या

शिरूर (तेजस फडके) : सोशल मीडियावर मराठा आंदोलनाला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही? असा मेसेज व्हायरल झाला आहे. संबंधित आरोप मनोज जरांगे यांनी खोडून काढला आहे. माध्यमं घाबरणारे व्यासपीठ नसून, त्यांनी सुरवातीपासून मोठ्या ताकतीने आपल्या आंदोलनाला प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाने गैरसमज करून घेण्याची गरज नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे पाटील म्हणाले, ‘मराठा समाजाला माझं आवाहन आहे की, सर्वच न्यूज चॅनलनी आपल्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली आहे. मराठा आंदोलन दाखवण्यासाठी माध्यमांनी कोणतीही काटकसर केली नाही. कारण प्रामाणिकपणा आणि जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे. त्यांच्यावर दबाव असेल आणि त्यामुळे ते आपलं आंदोलन दाखवत नाही असे मला वाटत नाही. मराठा समाज सर्वच न्यूज चॅनलवर प्रेम करतात. त्यामुळे एखाद्यावेळी आंदोलन दिसलं नाही म्हणून काहीतरी करायची मराठा समाजाला गरज नाही. सर्वच न्यूज चॅनलच्या पाठीशी मराठा समाज उभा आहे. त्यामुळे मराठा समाजाने मनात काही गैरसमज आणण्याची गरज नाही. माध्यमं ताकतीने मराठा आंदोलन दाखवत आहे आणि पुढेही दाखवतील. माध्यमं घाबरणारं व्यासपीठ नाही. त्यामुळे त्यांना सर्वांनी मिळून साथ द्यायला हवी.’

‘मराठा समाज एकत्र आला आहे. संख्या लाखांची आहे. समाज चांगला आशीर्वाद देत आहे. शेतकरी व्यावसायिक आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. आजपासून मराठा सर्व्हेक्षण होत असून, हे आरक्षण टिकणार आहे का? याच स्पष्टीकरण द्या, आम्ही हे नाकारलेले नाही. 54 लाख लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र दिले पाहिजे. अधिकारी सर्व्हेक्षण करतायत ही चांगली गोष्ट आहे. क्युरेटीव्ह पिटीशन आणि मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. पण, हे टिकणारे आहे की नाही याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे. आरक्षण टिकणारे आहे की नाही हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आम्हाला परवानगी देवो अथवा न देवो आम्ही आमरण उपोषणसाठी बसणार आहे. आम्ही कायद्याने परवानगी मागीतली आहे. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत,’ असेही जरांगे पाटील म्हणाले.

पुणे-नगर रस्त्यावर मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल

शिरुर तालुक्यात 22 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांची सभा

सणसवाडीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा…