मुख्य बातम्या

शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी अशोक पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांनी मोठी शक्ती प्रदर्शन करून खासदार संसदरत्न डॉ. अमोल कोल्हे व खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २४) उमेदवारी अर्ज भरला आहे. शिरूर विधानसभेची निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे उमेदवारी अर्ज दिला.

शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार घालून शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस आय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. आज सकाळी रासाई देवी वडगाव रासाई, श्री रामलिंग शिरूर, व घरातील कुलदेवता नतमस्तक होऊन आमदार अशोक पवार आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिरूर येथे आले. शिरूर येथे भव्य रॅलीने शक्तीप्रदर्शन करीत महिला, तरुण, पुरुष, वृद्ध असे अनेक नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाली होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी या चिन्हाची प्रतिकृती या रॅलीमधे सहभागी होती. तर महाविकास आघाडीचे मित्र पक्षांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे व मशाली चे फोटो व झेंडे तसेच काँग्रेस चे झेंडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची झेंडे यावेळी महिला व रॅलीमध्ये सहभागी नागरिकांनी घेतले होते. यावेळी महाविकास आघाडीचा विजय असो शरद पवार जिंदाबाद, उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद अशा गगनभेदी घोषणा देत मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये संचारलेला दिसला.

अशोक पवार म्हणाले, ‘शिरूर हवेली मतदार संघातून शिरूर हवेलीच्या मतदाररांच्या व सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी भेटली असून शिरूर तालुक्याचा व हवेली तालुक्याचा विकास हे एकमेव ध्येय आम्ही कायम ठेवत आहे. समोरील महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाही कारण त्यांच्याकडे उमेदवार नसून ते आता एक आयात उमेदवार घेत आहेत. समोरचा उमेदवार कोणी असो मी माझ्या परीने मी केलेली विकास कामे घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलो आहे.’

मित्राचा आशीर्वाद घेणे हे आपलं कर्तव्य…
शिरूर चे माजी आमदार शिरूर ते माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे राजकारणातील एक असा अवलिया होता की ते जिकडे तिकडे तेथे असंख्य कार्यकर्ते असायची कार्यकर्त्यांची फौज निर्माण करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचार प्रमुख मी होतो राजकारणा पलीकडेचे आमची मैत्री होती आणि ती मैत्री आम्ही आयुष्यभर जोपासली अशा मित्राचा आशीर्वाद घेणे हे आपलं कर्तव्य आहे असे म्हणत आमदार अशोक पवार यांनी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

शिरूर विधानसभेची निवडणूक लागली परंतु या निवडणुकीत 30 वर्षानंतर माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचा निधन झाले त्यामुळे या शिरूर शहर व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यात शिरूरचे आमदार अशोक पवार हे स्वर्गीय आमदार बाबूराव पाचर्णे यांचे जवळचे मित्र परंतु राजकारणाच्या वाटा वेगळ्या झाल्या ते पंधरा वर्षे एकमेकांचे कट्टर विरोधक व एकामेकांविरोधात तीन विधानसभा निवडणूक लढल्या. आमदार पाचर्णे आजारी असताना त्यांची दोन ते तीन वेळा तब्येतीची चौकशी करून आम्ही दोघे जवळचे मित्र होतो केवळ राजकारणामुळे आम्ही वेगवेगळ्या वाटा निवडल्या आहेत असे म्हणत अनेक गोष्टींची आठवण काढून ते गहिवरले होते.

या निवडणुकीत माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांचा निधन झालेले असल्याने शिरूर तालुक्यातील अनेक नेते त्यांच्या शक्ती स्थळावर जाऊन त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत आहे. यातच आमदार अशोक पवार यांनीही पाचर्णे यांच्या शक्ती स्थळावर येऊन त्यांचे दर्शन घेऊन एका मित्राचा आशीर्वाद घेतला आमदार बाबुराव पाचर्णे आणि माजी मैत्री होती ही संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. राजकारणात वाटा वेगळ्या झाल्या तरी आम्ही दोघांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर कधी टीका केली नसून, आम्ही राजकारणा पलीकडची आमची मैत्री कायम जोपासली असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

‘शिरुर-हवेली’ मधुन महाविकास आघाडीच्या वतीने अ‍ॅड अशोक पवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज

MEPL च्या विरोधात खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याप्रमाणे विधानसभेत आवाज उठवणार; अ‍ॅड अशोक पवार

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?

Loading ...
Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

18 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

19 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

24 तास ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago