क्राईम

शिरूरमध्ये लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीतील एका मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या व तडजोडीअंती १० हजार रुपये मागणार्‍या पोलिस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस उपनिरीक्षक माणिक बाळासाहेब मांडगे आणि खासगी व्यक्ती सुभाष मुंजाळ (रा. कवठे यमाई, ता. शिरुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या मुलाच्या विरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करु नये तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक माणिक मांडगे याने तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली.

 

या तक्रारीची ९ ऑक्टोबर रोजी टाकळी हाजी औट पोस्ट मध्ये पडताळणी करण्यात आली. माणिक मांडगे याने सुभाष मुंजाळ याच्याशी बोलण्यास सांगितले. खासगी व्यक्ती सुभाष मुंजाळ याने तक्रारदारांकडे साहेबांना देण्यासाठी म्हणून १० हजार रुपये लाच मागितली. त्याला माणिक मांडगे याने दुजोरा देऊन १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. प्रत्यक्ष सापळा कारवाई झाली नसली तरी लाचेची मागणी झाली असल्याने गुरुवारी दि. २४ ऑक्टोबर रोजी दोघांविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर हेअधिक तपास करीत आहेत.शिरुर तालुक्यातील महसुल विभागातील काही तलाठी, मंडल आधिकारी खरेदीखताच्या, वाटप पत्राच्या नोंदी पैश्याच्या हव्यासापोटी लवकर करत नाहीत. नागरीकांकडून ते नोंदीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असून ते आता लाचलुचपत विभागाच्या रडारवर असल्याची सुत्रांची माहीती आहे.

शिरुरच्या पुर्व भागात मुजोर वाळु माफियांचा हौदोस; गुनाट येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

शिरूर! आई-वडिलांचे भांडण अन् चिमुकल्याचा बिबट्याने घेतला जीव…

शिरूर तालुक्यात हॉटेल मधील हुक्का पार्टीवर पोलिसांची कारवाई…

पुणे-नगर महामार्गावरील सरदवाडी येथे ट्रकच्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू…

शिरुर पोलिसांनी गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला केले गजाआड

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

8 तास ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

21 तास ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

21 तास ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

1 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

1 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

1 दिवस ago