राजगड (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील राजगड परिसरातील करंजवणे गावात भात लागवडीदरम्यान एक अनोखी आणि थोडीशी गंमतीशीर घटना घडली आहे. एका ट्रॅक्टरच्या चिखलात अडकण्याने सुरु झालेला प्रकार एकामागोमाग तब्बल ११ ट्रॅक्टर अडकल्याने शेतात काम ठप्प झाले.
स्थानिक शेतकरी भात लागवडीसाठी शेतात गेले होते. मात्र, शेतात चिखल खुप खोल असल्याचा अंदाज न आल्याने एक ट्रॅक्टर चिखलात खोलवर अडकला. त्याला बाहेर काढण्यासाठी आणलेले इतर १० ट्रॅक्टरही अडकले आणि सगळ्या शेताचं दृश्य एकदम विचित्र झालं.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले की, “चिखलाची खोली खूपच जास्त होती अंदाज चुकला आणि एकामागोमाग एक ११ ट्रॅक्टर फसत गेले.” या प्रकारामुळे काही वेळासाठी संपूर्ण लागवड थांबवावी लागली.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. मात्र शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागला.
Video; शिरुर तालुक्यातील शांताई डेअरी मध्ये शेतकऱ्यांची फसवणुक होत असल्याचा आरोप
शिरुर पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश
शिरुर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई मोटेवाडी येथे डाळिंब चोरी करणारा चोरटा गजाआड
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…
२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…
हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…
मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…