शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 30 जागा, महायुतीला 17 जागा तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार निवडुन आला. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांना ‘तु खासदार कसा होतो, तेच बघतो’ असा दम दिला. त्यानंतर शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना ‘तु आमदार कसा होतो असा दम दिला. त्यानंतर नगर दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके आणि बीडचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना दम दिला. परंतु महाराष्ट्रातील स्वाभिमानी मतदारांनी मात्र ‘ये दादागिरी नही चलेगी, करारा जबाव मिलेगा’ असं म्हणतं कोल्हे, लंके आणि सोनवणे यांना दिल्लीत पाठवलं.
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र राज्यात विविध घडामोडी घडल्या. आधी भाजपाला सत्तेपासुन दुर ठेवत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती झाली. त्यानंतर शिवसेना उभी फूट पाडत एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पाडत अजित पवार सत्तेत सामील झाले. त्यानंतर देशातील लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. परंतु लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांना साथ न देणाऱ्या आणि त्यांना सोडुन जाणाऱ्या खासदार तसेच आमदार आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आव्हान दिलं होत.
परंतु भाजपाने केलेल फोडाफोडीच राजकारण महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेच्या पचनी पडलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना स्वाभिमानी मतदारांनी साथ देत महायुतीला महाविकास आघाडीला पसंती देत महायुतीला नाकारल्याचे स्पष्ट चित्र सगळीकडे दिसत आहे. लोकसभेच्या निकालाचा मोठा परिणाम यापुढील विधानसभा, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच इतर सर्व निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
शिरुर मतदार संघात तुतारी वाजली, घड्याळाची टिकटिक बंद
शिरुरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन तालुकाध्यक्षाच्या गावातच डॉ. अमोल कोल्हे यांना आघाडी
शिरुरमध्ये अजित पवार यांना धक्का! पाहा कुठे फिरली निवडणूक
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…