मुख्य बातम्या

पुणे ग्रामीण पोलिस दलातील वसुलीबहाद्दरांना दाखवणार मुख्यालयाचा रस्ता…? वरिष्ठांकडून मोठ्या फेरबदलाचे संकेत

शिरुर (अरुणकुमार मोटे) लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता संपल्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात आता मोठ्या प्रमाणात खळबळ उडणार असुन अनेक फेरबदल होण्याची शक्यता सुत्रांनी दिली असून ‘आर्थिक वसुली’ करणाऱ्या पोलिसांना पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे जिल्हा मुख्यालयाचा रस्ता दाखवणार असल्याची खात्रीलायक माहीती मिळत आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठी धडकी भरली आहे.

 

दरवर्षी मे महिन्यात ज्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचा प्रशासकीय कालावधी पुर्ण होतो. त्यांच्या बदल्या इतरत्र केल्या जातात. परंतु सध्या लोकसभेची आचारसंहीता (दि ४) जुनपर्यंत होती. त्यामुळे अदयाप बदल्या होऊ शकल्या नाही. आता आचारसंहिता संपल्याने सर्व बदल्या होणार आहेत. अशी खात्रीलायक माहीती सुत्रांनी दिली आहे.

 

पाच महिन्यांपूर्वी पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतलेल्या पंकज देशमुख यांनी प्रत्येक पोलिस स्टेशनला वसुली बंद करुन अवैध धंदे बंद करण्यासाठी आदेश दिले होते. परंतु अवैध धंदे काही बंद झाले नाही. त्यामुळे त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक पोलिस ठाण्यातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची माहिती अतिशय गोपनीय पद्धतीने संकलित केल्याचे माहिती मिळत आहे. त्यानुसारच साहेबांचा आदेश डावलून कलेक्शन करणाऱ्या पोलिसांना आता मुख्यालयाचा रस्ता धरावा लागणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

 

त्यामुळे शिरुर, रांजणगाव, शिक्रापूर, दौंड, यवत, तळेगाव, कामशेत, मंचर, पारगाव, खेड, मंचर, आळेफाटा या पोलिस स्टेशनमधील कलेक्शन बहाद्दरांना चांगलाच घाम फुटल्याचे चित्र दिसत आहे. याची चर्चा वरील पोलिस स्टेशनमध्ये चांगलीच रंगत असून वसूली करणाऱ्यांचे चेहरे मात्र चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. आता कडक शिस्तीचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे कधी कारवाई करतात…? तसेच यामध्ये राजकीय हस्तक्षेप होणार का…? याकडे पुणे जिल्ह्यातील नागरीकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यकाळ पुर्ण होऊनही ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी…?

शिरुर तालुक्यात गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात…? पोलिस सिंघमगिरी दाखवणार का…?

पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या धडाकेबाज कारवाईची सगळीकडे जोरदार चर्चा

महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी मतदारांनी दाखवून दिलं; ये ‘दादागिरी’ नही चलेगी, करारा ‘जबाव’ मिलेगा

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago