आरोग्य

मऊ पडलेली बिस्किट पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

चहाशिवाय बिस्किटे खाण्याची मज्जा देखील नाही. काहींना बिस्किटे पाण्यासोबत खायला आवडतात. बिस्किटे पॅकेटमधून काढल्यानंतर ती मऊ पडतात. त्यांना हवा लागल्यानंतर मऊ पडल्यामुळे चव देखील बदलते. त्यांचा क्रिस्पीपणा कमी होतो. ज्यामुळे ती पुन्हा खाता येत नाही. अनेक लोक मऊ पडलेली बिस्किटे फेकून देतात. जर आपण देखील बिस्किटे नरम पडली म्हणून फेकून देत असू तर या टिप्स लक्षात ठेवा. ज्यामुळे बिस्किटे कुरकुरीत आणि फ्रेश राहतील.

पॅकेट उघडल्यानंतर उरलेली बिस्किटे आणि कुकीज हवाबंद डब्यात ठेवा. काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यात आपण ठेवू शकतो. ज्यामुळे ती नरम पडणार नाही. बिस्किटे आणि कुकीज कुरकुरीत ठेवण्यासाठी आपण झिप पाऊचा वापर करु शकतो. हवेच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. या पद्धतीने साठवल्यास ती ओली होत नाही आणि चव देखील तशीच राहते. कुकीज जास्त काळ टिकवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर आपण करु शकतो. डब्यात टिश्यू पेपर पसरवून बिस्किटे आणि कुकीज ठेलव्यानंतर त्यावर टिश्यू पेपर ठेवून व्यवस्थित झाका. यासाठी आपण फॉइल पेपरचा वापर करु शकतो. बिस्किटे आणि कुकीज जास्त वेळ कुरकुरीत ठेवण्यासाठी भाताची मदत घेऊ शकता. ज्या डब्यात कुकीज ठेवणार असाल त्यामध्ये तांदळाचे काही दाणे ठेवा. यामुळे बिस्किटांना ओलावा सुटणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

9 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

9 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

9 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago