आरोग्य

केसांच्या वाढीसाठी हा पदार्थ केसांना लावा महिन्याभरात घनदाट होतील

केस गळण्याच्या समस्येन प्रत्येकजण त्रस्त असतो. आपले केस लांबसडक, दाट असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. केसांची काळजी घेण्यासाठी आणि केसांना हेल्दी बनवण्यासाठी बाजारात बऱ्याच ट्रिटमेंट्स उपलब्ध आहेत पण याचा फारचा उपयोग दिसून येत नाही. तुम्हा नैसर्गिक पद्धतीनं केस वाढवायचे असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून केसांना लांब, दाट बनवू शकता. झोपण्याआधी काही खास पदार्थ केसांना लावून तुम्ही केसांचे आरोग्य सुधारू शकता. केस चांगले ठेवण्यासाठी केसांना शॅम्पूने घासणं टाळायला हवं, कंडीशनर लावणं टाळा, टॉवेलनं रब करून केस पुसू नका, केस ओले असताना अजिबात विंचरू नका. हेअर कलर, हेअर डाय यांसारख्या केमिकल्सचा वापर टाळा.

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

१) नारळाचं तेल

नारळाच्या तेलानं केसांच्या मुळांची मालिश केल्यानं केसांच्या मुळांना पोषण मिळते. ज्यामुळे केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहते. केसांमध्ये कोंडा होत नाही. हलक्या गरम नारळाच्या तेलानं केसांची मालिश करा आणि रात्रभर तसंच सोडून द्या आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा. या उपायानं केस मऊ, मुलायम होतील. केस तुटण्याची समस्या उद्भवणार नाही. तसंच केसांची वाढही भराभर होईल.

२) एलोवेरा जेल

एलोवेरामध्ये प्राकृतिक एंजाईम्स असतात ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. ताजं एलोवेरा जेल स्काल्पवर लावून हळूहळू मसाज करा. रात्रभर तसंच सोडून द्या. हा घरगुती उपाय केल्यानं केसांची हरवलेली चमक परत येईल आणि केस दाट होतील.

३) कांद्याचा रस

कांद्याच्या रसात सल्फर असते. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि नवीन केस उगवण्यास मदत होते. कांद्याचा रस काढून केसांच्या मुळांना लावल्यास केस गळण्याच्या त्रासापासून सुटका होते आणि केस वेगानं वाढतात.

४) मेथीच्या बीया

मेथीच्या बीयांमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक एसिड असते. ज्यामुळे केसांना पोषण मिळते. मेथीच्या बीया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट बनवून केसांच्या मुळांना लावा.

५) दही आणि मध

दही आणि मधाचं मिश्रण केसांसाठी नॅच्युरल कंडिशनरप्रमाणे काम करते. दह्यात १ चमचा मध मिसळून केसांच्या मुळांना लावल्यानं या उपायाने केस सॉफ्ट, शायनी, मजबूत होतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

6 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

6 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

8 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago