आरोग्य

मध चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

मध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी जर कोमट पाण्यामध्ये एकत्र करून मध आणि लिंबूरस घेतला तर व्यक्तीच्या शरीराला अनेक फायदे होतात. पण आज आम्ही तुम्हाला मधाच्या ब्युटी टिप्स सांगत आहोत ज्यांच्या बद्दल यापूर्वी तुम्ही कधी ऐकले नसेल. मध आरोग्याला चांगले ठेवण्याच्या सोबतच आपली सुंदरता देखील वाढवण्यासाठी मदत करते. चला तर पाहू मध आपल्या सुंदरते मध्ये वाढ करण्यास कसा मदत करतो.

तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असेल की अनेक लोकांच्या चेहऱ्यावर काळे किंवा भुरे डाग असतात. या दागाच्या मुळे चेहऱ्याची सुंदरता निघून गेलेली असते आणि चेहरा वेगळाच दिसायला लागतो. यावर उपाय म्हणून तुम्ही 1 कपामध्ये 2 चमचे मध घ्यावे त्यामध्ये थोडेसे लिंबू एकत्र करावे. आता या वस्तूंना एकत्र करावे आणि चेहऱ्यावर 20 मिनिट लावून ठेवावे. 20 मिनिटानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवावा. तुम्हाला हा उपाय एक दिवसा आड करायचा आहे म्हणजे दोन दिवसा मध्ये एक दिवस करायचा नाही.

चेहऱ्यावर सुरुकुत्या पडल्यास व्यक्ती आपल्या वया पेक्षा मोठा दिसायला लागतो म्हणजेच वयस्कर दिसायला लागतो. अश्यात जर तुम्हाला यापासून सुटका मिळवायची असेल तर एका भांड्यात 2-3 चमचे मध घ्यावे त्यामध्ये विटामिन E ची कैप्सूल एकत्र करा. आता या दोन्ही वस्तूंना व्यवस्थित एकत्र करा आणि चेहऱ्यावर सर्कल मोशन मध्ये मसाज करा आणि 20 मिनिट लावून ठेवा आणि त्यानंतर चेहरा धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून कमीतकमी 2 वेळा करावा. काही महिन्यातच चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून गेल्याचे जाणवेल.

थंडीच्या मौसमात प्रत्येकाची त्वचा कोरडी होते. अश्यात जर काही थेंब मध घेऊन त्यास आपल्या चेहऱ्यावर क्रीम प्रमाणे लावावे आणि 15 मिनिटांनी चेहरा धुवावा. असे काही दिवस करावे तुमचा चेहरा कोमल होईल आणि थंडी मुळे फाटणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

9 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

9 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

13 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

13 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

13 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

13 तास ago