मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग; गोळीबाराची घटना…

शिरूर (तेजस फडके) : पुण्यातील चऱ्होली भागात १३ मे रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत असताना शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात शुक्रवारी सायंकाळी पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग व कथित गोळीबाराची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. अष्टविनायक रोड, पिंपरी दुमाला, वाघाळे आणि सोनेसांगवी परिसरात मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन राबवले।

पुणे शहराजवळील चऱ्होली येथे राहणारे करण गुरुनाथ राठोड (वय २३) यांनी शेखर संभाजी जाधव (वय २५, शिक्रापूर) याला ‘चोऱ्या करू नको, सुधार’ असा सल्ला दिला होता. याच कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद व मारहाण झाली होती. त्याचा राग मनात धरून शेखर जाधव याने आपल्या तीन साथीदारांना बोलावून घेत करण राठोड व त्यांच्या मित्राला बेदम मारहाण केली. त्यानंतर शेखरने जवळील पिस्तुलातून करण यांच्या दिशेने गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली आणि साथीदारांसह फरार झाला होता. या घटनेप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात शेखर संभाजी जाधव व त्याच्या तीन साथीदारांविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांची विशेष पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली होती.

शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी परिसरातील शेळके वस्ती भागात आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी सायंकाळी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर अष्टविनायक रोडवरील गणपती चौक परिसरात पोलिस आणि आरोपींमध्ये काही काळ थरारक पाठलाग सुरू झाला. आरोपींची दुचाकी अचानक बंद पडल्याने किंवा नियंत्रण सुटल्याने त्यांनी वाहन रस्त्यातच टाकून दिले. त्यानंतर अंधार आणि परिसरातील दाट उसाच्या शेतांचा फायदा घेत आरोपींनी पिंपरी दुमाला-वाघाळे परिसराच्या दिशेने धाव घेत पलायन केले.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, आरोपींकडून पोलिसांच्या दिशेने हवेत गोळीबार करण्यात आल्याची चर्चा होती. त्यानंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी हवेत काही राऊंड फायर केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या संपूर्ण घटनेबाबत अधिकृत दुजोरा अद्याप पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही.

घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस, पुणे ग्रामीण पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांची अतिरिक्त पथके घटनास्थळी दाखल झाली. संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. उसाच्या शेतांमध्ये, वस्तीभागात तसेच गावालगतच्या रस्त्यांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. रात्री उशिरापर्यंत आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, मुख्य संशयित शेखर संभाजी जाधव याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या संपूर्ण घटनेमुळे सोनेसांगवी, पिंपरी दुमाला आणि वाघाळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मध्यरात्रीपर्यंत पोलिसांच्या वाहनांची धावपळ, नाकाबंदी आणि सर्च ऑपरेशनमुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली होती.

शिरूर तालुक्यातील महिलेला चोराचा चेहरा पाहून बसला धक्का; लाखोंचे दागिने हस्तगत…

Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…

कलाकेंद्रावरील कथित गोळीबार प्रकरण; गोळीबाराच्या घटनेचा राजकीय हेतूने गैरवापर, शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा निषेध

शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…

शिरुर तालुक्यात युवकावर पिस्तुल रोखून गोळीबार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

7 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

11 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

11 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

12 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

12 तास ago