आरोग्य

उत्तम आरोग्यासाठी रोज वाजवा शंख; जाणून घ्या मुख्य फायदे

शंख हे रणवाद्य आहे, हे आपण जाणतो. महाभारतातही कृष्ण तसेच कौरव, पांडवांकडे वैशिष्ट्यपूर्ण शंख होते, त्याला सुंदर नावे होती आणि शंख फुंकून युद्धाची घोषणा केली जात असे. युद्धात शंख फुंकायचा, म्हणजे त्यासाठी शंख वादनाचा रोजचा सराव नक्कीच असणार! तो आपलाही असायला हवा. भले आपल्याला युद्धात शंख फुंकायचा नाही, पण आरोग्याची लढाई जिंकायची असेल तर रोज शंख वाजवण्याचा सराव केला पाहिजे.

हिंदू धर्मात विष्णूंना प्रिय शंख म्हणून देव्हाऱ्यात शंख ठेवला जातो. रोज पूजाही केली जाते. शंख पाण्याने धुवून आतून बाहेरून स्वच्छ केला जातो. त्याला गंध, अक्षता, फुल वाहिले जाते. ज्यांना शंख वादन येते ते शंख फुंकतात, बाकीचे पूजा करून परत देव्हाऱ्यात ठेवून देतात. मात्र शास्त्रानुसार पूजेनंतर रोज तीन वेळा शंख वादन करायला हवे. कारण शंखध्वनीमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि रोजच्या सरावामुळे आरोग्यही सुधारते.

शंख वादन करून आरोग्य सुधारता येते, हे अनेकांना माहीत असते पण ते त्याचा सराव करत नाहीत. मात्र पुढील उपयोग वाचून लोकांमध्ये निश्चितपणे शंखवादन सुरु करतील.

स्नायू मजबूत होतात

शंख वादनामुळे मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंना उत्तम व्यायाम मिळतो. एवढेच नाही तर गुदाशयाचे स्नायूही बळकट होतात आणि चयापचय यंत्रणा सुरळीत होते.

फुफ्फुसाचे स्नायू बळावतात

शंख वाजवण्याने प्रोस्टेट ग्रंथींवर दबाव पडतो आणि याने प्रोस्टेट स्वास्थ सुधारतं. हे प्रोस्टेट वृद्धी रोखण्यात मदत करतं. फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी व फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होतो आणि श्वास घेण्याची क्षमता वाढते. थायरॉईड ग्रंथीत सुधारणा होते. व्होकल कॉड्स सुरळीत कार्य करतात. बोलण्यात स्पष्टता येते. बोबडे बोलणे सुधारते. अमुक एक वयानंतरही मुलांमध्ये तोतरेपणा जाणवत असेल तर मुलांकडून शंख वादनाचा सराव करून घ्यावा. वाचा सुधारते.

सुरकुत्या दूर होतात

चिरतरुण सौंदर्यासाठी शंखवादन करावे. त्यामुळे चेहर्‍याचे स्नायू खेचले जातात, लवचिक होतात आणि त्वचा उजळते व अकाली सुरुकुत्या येण्याचे कारण दूर होते. तसेच त्वचारोग निवारणासाठीही शंखाचा उपयोग केला जातो. त्यासाठी रात्र भर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे. सकाळी या पाण्याने शरीरावर मालीश करावी. याने त्वचेसंबंधी रोग दूर होतात.

ताण दूर होतो

शंखाच्या ध्वनीमध्ये सकारात्मकता असते. वातावरण शुद्धी होते. वाईट विचार दूर होतात आणि डोक्यातील विचारांचे चक्र थांबून मेंदूवरील ताण हलका होण्यास मदत होते. शंख वाजवताना त्यातून ऊँकाररुपी ध्वनी बाहेर पडतो, ज्यामुळे मन प्रसन्न होते. तसेच नियमित शंख वाजवणार्‍यास हार्ट अटॅकचा धोका टळतो. शंख वाजवणे हे श्वास नियंत्रणाचे काम असल्याने सर्व ब्लॉकेज उघडतात. असे हे शंख वादन आरोग्यासाठी लाभदायी आहे, त्यामुळे कोणाच्या नावे शंख करण्यापेक्षा पांढरा शुभ्र शंख रोज तीन वेळा वाजवायला सुरुवात करा. शंख वादन कसे करायचे ते शिकून घ्या. मात्र, त्याचा अतिवापर करू नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

3 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

3 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

5 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

24 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

24 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago