भारतात प्रत्येत घरात वापरल्या जाणाऱ्या मेथीच्या बियांना पारंपरिक औषध म्हणून ओळख मिळाली आहे. पण, या छोट्याशा बियांचं खरं रहस्य काय आहे. त्या वजन कमी करण्यात मदत करतात का, हार्मोन्स संतुलित ठेवतात का की उलट पचनावर परिणाम करतात.
मेथीच्या बिया खायच्या की टाळायच्या
मेथीच्या बिया शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असल्या तरी त्यांचं योग्य प्रमाणात आणि पद्धतीनं सेवन करणं गरजेचं आहे. या बिया टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवतात, वजन कमी करण्यास मदत करतात, स्त्रियांमध्ये दूधनिर्मिती वाढवतात, रक्तातील साखरेचं नियमन करतात आणि PCOS असलेल्या महिलांसाठी फायदेशीर ठरतात. तसेच त्या रजोनिवृत्तीतील उदासीनता आणि गरम झटके कमी करण्यातही मदत करतात. मात्र, त्यांचा वास कधी कधी मेपल सिरपसारखा गोड जाणवतो आणि सेवन करण्यापूर्वी त्या रात्रभर भिजवणे अधिक चांगलं ठरतं.
वजन कमी करायचंय? मेथीच्या बिया देतील नैसर्गिक साथ
“मेथीच्या बिया वजन कमी करण्यात मदत करू शकतात. परंतु मेथी हा काही झटपट आराम मिळवण्याचा उपाय नाही. मेथीमध्ये विद्राव्य (विरघळणारे) फायबर मुबलक प्रमाणात असते. हे फायबर पोटात जेलसारखा थर तयार करते, ज्यामुळे पचनाची प्रक्रिया मंदावते, भूक उशिरा लागते आणि अन्नाचे सेवन कमी होते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.” पण, त्या यावर भर देतात, मेथीच्या बिया ही जादूची गोळी नाही; मेथीचं सेवन संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैलीसह केल्यास प्रभावी ठरते..
पुरुषांसाठी मेथी – टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचा नैसर्गिक मार्ग
पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवण्याच्या दृष्टीनं मेथी उपयोगी ठरू शकते, मेथीतील नैसर्गिक संयुगं हार्मोन्सच्या संतुलनात मदत करतात आणि शरीरात ऊर्जा टिकवतात. मात्र हा परिणाम सौम्य असतो. अचानक त्यामध्ये वाढ होत नाही.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी कशी मदत करते
मेथीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ती रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. “मेथी HbA1C पातळी कमी करते आणि इन्सुलिन प्रतिसाद सुधारते. ती शरीरातील GLP-1 नावाचं हार्मोन वाढवते, जे रक्तातील साखरेचं नियमन करतं. हेच हार्मोन काही आधुनिक मधुमेहावरील औषधांमध्येही वापरलं जात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी नियमित आणि नियंत्रित प्रमाणात घेणं फायदेशीर ठरू शकतं.
मेथीचं योग्य प्रमाण आणि सेवन पद्धत
दररोज एक ते दोन चमचे मेथी पुरेशी आहे. ती रात्रभर भिजवून सकाळी सेवन केल्यास पचन सुधारते आणि पोषक घटकांचे शोषण अधिक चांगले होते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…