आरोग्य

डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी खा ‘या’ गोष्टी

रताळे:- रताळे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असतं जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी चांगलं असतं. व्हिटॅमिन ए शरीरात कमी झालं तर डोळ्यांसंबंधी समस्या होतात. रताळ्याच्या सेवनाने डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो आणि रेटिनाची दृष्टी वाढते. डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीनही भरपूर असतं.

गाजर:- गाजर आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतं. या दोन्ही तत्वांमुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. यानी डोळ्यांच्या सेल्स वाढतात. गाजराचा ज्यूस रोज सेवन केल्यास डोळे चांगले राहतात. तसेच तुम्ही गाजर जेवणासोबत सलाद म्हणूनही खाऊ शकता.

आवळा:- आयुर्वेदात आवळ्यात फार महत्वाची औषधी मानलं जातं. आवळे डोळ्यांसाठी अमृतासमान असतात. आवळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ज्याने डोळ्यांच्या मसल्स मजबूत होतात आणि डोळ्यांमधील ब्लड फ्लोही सुरळीत होतो. रोज रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. तसेच वाढत्या वयासोबत होणाऱ्या डोळ्यांच्या समस्याही कमी होतात.

पपई:- पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. पपई आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. पपईचं नियमितपणे सेवन केल्याने डोळ्यांना नुकसानकारक किरणांपासून वाचवलं जातं. पपई तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता. पपई स्मूदी सेवन करू शकता. डोळ्यांची जळजळ आणि सूज पपईने दूर होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

9 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

23 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago