आरोग्य

व्हायरल इन्फेक्शनमुळे थकवा आला, इम्युनिटी बूस्टसाठी खा ही खास चिक्की

पावसाळा, हवामान बदल आणि संसर्गजन्य आजारांमुळे आपल्याला अनेक व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होतो. या काळात सर्दी, खोकला, शरीर थकलेलं वाटणं, अंगदुखी, ताप आणि अशक्तपणा जाणवतो. याला बॉडी लो होणं असं देखील म्हणतात. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने आपल्याला उठण्या-बसण्याची ताकद राहत नाही. यावर वेळीच लक्ष दिले नाही तर अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.

इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आपण आहारात काही महत्त्वाचे पदार्थ खायला हवे. अशावेळी आपण सूप, काढा, आल्याचा चहा, हळदीचे दूध किंवा तुळशी व गवती चहा अशा पदार्थांचा आहारात समावेश करतो. ज्यामुळे काही प्रमाणात आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. पण इम्युनिटी बूस्टसाठी आपण खास चिक्की तयार केली तर शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होईल. पावसाळ्यात आपल्याला गळ्याचे इन्फेक्शन होते. ज्यामुळे खाताना पिताना आपल्याला त्रास होतो. अशावेळी आपण अनेक औषधेपचार करतो. आपण इम्युनिटी बूस्टसाठी तयार करुन खाऊ शकतो.

साहित्य 

भाजलेले चणे – ३०० ग्रॅम

बदाम – ७० ग्रॅम

काजू – ७० ग्रॅम

शेंगदाणे – ७० ग्रॅम

मखाणा – ५० ग्रॅम

गूळ – २५० ग्रॅम

पाणी – १५० ग्रॅम

काळी मिरी – ५ ते ६

सुंठ पावडर – अर्धा चमचा

तूप – २ चमचे

कृती 

1) सगळ्यात आधी कढईमध्ये चणे, शेंगदाणे, बदाम, काजू, मखाने आणि तूप घालून ७ ते ८ मिनिटे चांगले भाजून घ्या.

2) आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले सर्व साहित्य आणि काळेमिरी, सुंठ पावडर घालून त्याचा पावडर तयार करा.

3) त्यानंतर एका भांड्यात पाणी आणि गूळ घालून चांगले वितळवून घ्या. गूळाचे पाणी झाल्यानंतर त्यात मिक्सरमध्ये वाटलेले सर्व साहित्य घाला. यात वरुन भाजलेले चण्याची डाळ घाला.चमच्याने चांगले हलवत राहा. मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत चमचा हलवत राहा.

4) आता एका ताटाला तूप लावून मिश्रण पसरवून घ्या. थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडा. आपण याचे लाडू देखील बनवून खाऊ शकतो. साठवण्यासाठी आपण हे फ्रीजमध्ये देखील ठेऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

9 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

9 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

9 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago