आरोग्य

थंडीत भरपूर आल खाणही महागात पडू शकत कस ते जाणून घ्या…

आल्याच्या वापर भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये केला जातो. याने पदार्थांचा टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आल्याने पचन तंत्र मजबूत राहतं, सूज कमी होते आणि इम्यून सिस्टीमही मजबूत राहतं. मात्र, ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीची अति नुकसानकारक असते, तेच आल्याबाबतही लागू पडतं. आल्याचा जास्त वापर केल्यानं शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. आल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण याच्या अधिक वापराने आरोग्यासंबंधी काही समस्या होऊ शकतात. त्यामुळे आल्याचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे.

जास्त आले खाण्याचे नुकसान

आल्यामध्ये भरपूर प्रमाणात जिंजरोल नावाचं तत्व असतं. ज्यामुळे पचन तंत्र उत्तेजित होतं. याने पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत मिळते. मात्र, आले जास्त खाल्ल्याने पोटात जळजळ आणि अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.

आल्यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुण असतात. जर तुम्ही याचा वापर जास्त केला तर रक्ताची गाठ तयार होऊ शकते. खासकरून अशा लोकांना जे रक्त पातळ करण्याचं औषध घेतात.

काही लोकांना आल्यापासून एलर्जीही असते. अशात जास्त आले खाल्ल्याने त्वचेवर रॅशेज, खाज आणि इतर एलर्जीसंबंधी समस्या होऊ शकतात.

आल्यामध्ये ब्लड शुगर कमी करण्याची क्षमता असते. अशात याच्या जास्त वापराने हायपोग्लायसीमिया लो ब्लड शुगरची समस्या होऊ शकते. यात चक्कर येणे, कमजोरी आणि डोकेदुखी अशा समस्या होऊ शकतात.

गर्भवती महिलांनी आले जास्त प्रमाणात खाऊ नये. यामुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो. कमी प्रमाणात आले खाणं गर्भवती महिलांसाठी सुरक्षित मानलं जातं. याने मळमळ आणि उलटी कमी करण्यास मदत मिळते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

3 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

3 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

5 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

24 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

24 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago