आरोग्य

जाणून घ्या आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ आणि फलदायी आहे. व्यवसायात नवीन डिल होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग असून त्यात लाभ होईल. दुपारनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वादविवाद होऊ शकतो, त्यामुळे सर्तक राहा आणि वादविवाद वाढणार नाही याची काळजी घ्या. संध्याकाळी पाहुणे येणार आहेत त्यामुळे खर्च वाढेल.

वृषभ: आजचा दिवस चांगला आहे. घरासाठी काही वस्तू खरेदी करणार आहात. आजचा खर्च चांगल्या कामासाठी असेल त्यामुळे घरातील मंडळी तुमच्यावर खुश असतील. शुभ कार्यासाठी खर्च होणार. जे लोक व्यवसायात आहेत त्यांचा व्यापाऱ्यांशी मतभेद होऊ शकतो पण तुम्ही कौशल्यामुळे सगळ्यांवर मात कराल.

मिथुन: आजचा दिवस फारसा ठिक नाही खास करून जे जे जातक राजकारणात आहेत त्यांना अडथळे येवू शकतात. हुशारीने गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत सावध राहा. या परिस्थितीत कोणी तुमच्याकडे आर्थिक मदत मागितली तर शक्यतो त्याला नकार द्या. संपत्ती किंवा मालमत्तासंदर्भातील प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल.

कर्क: आजचा दिवस उत्तम आहे. जे काम हाती घेणार ते व्यवस्थित पूर्ण करणार आहात. मालमत्तेसंदर्भातील प्रश्न मार्गी लागतील. प्रत्येक कामात जोडीदाराची साथ मिळेल तसेच व्यवसायात तुम्हाला सगळेजण मदत करतील. तुमच्याकडून भरपूर दानधर्म होईल. आर्थिक स्थिती उत्तम आहे तेव्हा गुंतवणूकीचा विचार नक्की करा.

सिंह: आजचा दिवस संमिश्र फल देणार दिवस आहे. तुमची एक खास इमेज समाजात तयार होईल. तसेच बढतीची संधी आहे. नवीन गोष्ट सुरु करण्यासाठी वेळ चांगली असून वादविवादापासून दूर राहा. कायदेशीर वादावर तोडगा सापडेल. सर्व आवश्यक आणि महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. जास्त काम ताण वाढवेल, काळजी घ्या.

कन्या: आजचा दिवस उत्तम असून धनलाभाचा योग आहे. ऑफिसमध्ये जबाबदारी वाढल्यामुळे थोडी विचित्र परिस्थिती तयार होईल पण घाबरू नका. नोकरी- व्यवसायात तुमची पकड उत्तम आहे, तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. घरातील समस्या मार्गी लागतील त्यामुळे वातावरणात समाधान असेल.

तुळ: आजचा दिवस फारसा ठिक नाही कारण एखादी मौल्यवान वस्तू चोर होण्याची किंवा हरविण्याची शक्यता आहे, सावध राहा. व्यवसायात तुम्ही काही नवीन गुंतवणूक करणार आहात त्याचा तुम्हाला फायदा होईल. कामाच्या बाबतीत दिवस ठिक आहे पण कामात फोकस ठेवा. सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी काही खर्च करावे लागेल.

वृश्चिक: आजचा दिवस ठिक आहे. नोकरी असो व्यवसाय तुम्हाला व्यवस्थापन आणि नियोजन याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. ऑफिसमध्ये तुमच्या अधिकारांमध्ये वाढ झाल्याने सहकारी कदाचित नाराज होतील, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. दुसऱ्यांना मदत केल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. तुमची तुलना इतरांसोबत करु नको.

धनु: आजचा दिवस फारसा ठिक नाही. समस्यांवर तोडगा काढण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. स्वतःवर काही खर्च कराल.नोकरीत थोडे बदलाचे संकेत आहेत. तर घरात नाराजीचे सुर आहेत त्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ असाल. तुमचा संयमी स्वभाव आणि सौम्य वागणुकीने वातावरण हलकेफुलके करण्याचा प्रयत्न कराल. प्रियजनांच्या भेटीमुळे तुम्हाला थोडे उत्साही वाटेल.

मकर: आजचा दिवस ठिक आहे. आज एखाद्या नवीन डील होणार असून त्यातून धनलाभाची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारते आहे तेव्हा बचतीकडे लक्ष द्या. मित्रांनी एखादी योजना सांगितली तर त्यापासून दूर राहा. कामात जोखीम घेवू नका. काम करताना तसेच वाहन चालवताना ताणतणावाला तुमच्यावर हावी होवू देवू नका.

कुंभ: आजचा दिवस ठिक आहे. एखाद्या कामात उत्तम यश मिळणार आहे. भरपूर पैसा मिळाल्यामुळे समाधान मिळेल. आज तुम्ही जे काही काम करणार त्यात नशिबाची साथ असेल. जे काही काम ठरवणार आहात ते काम तुम्ही वेळेत पूर्ण कराल. तसेच तुमच्या कामाचे कौतुक होईल. घरात सुरु असणारा वाद कमी होईल.

मीन: आजचा दिवस उत्तम असून कठोर मेहनतीचे फळ मिळेल. दिवस आनंदात आणि आरामात जाणार आहे. दरम्यान खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. तब्येतीची काही तक्रार असेल तर तपासणी करुन घ्या. ऑफिसमध्ये मान-प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या कामातील गती वाढविण्यासाठी काही गोष्टींचा खास विचार करावा लागले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दहा गुन्ह्यांचा आरोपी! पुण्यातून अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २५…

6 तास ago

शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…

शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या…

7 तास ago

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

23 तास ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

23 तास ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

24 तास ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

24 तास ago