Portrait of a leopard (Panthera pardus), Sabie-Sand nature reserve, South Africa?
शिरूर (अरुणकुमार मोटे): निमगाव दुडे (ता. शिरूर) येथील कवठे येमाई रोडवर, घोड नदीच्या काठावर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवार (ता. २) रात्रीच्या सुमारास एक नर बिबट्या यशस्वीपणे जेरबंद झाला. सुमारे सहा ते सात वर्षे वयोगटातील या बिबट्याला माणिकडोह बचाव केंद्रात सुरक्षित स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती वनरक्षक नारायण राठोड यांनी दिली.
निमगाव दुडे, दुडेवाडी, टाकळी हाजी येथील खडकवस्ती व रावडेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच घोडनदीच्या दोन्ही काठांवरील गावांमध्ये बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी जोर धरत होती.
दरम्यान, परिसरात ऊसतोडीचे काम सुरू असल्याने बिबटे ऊसातून बाहेर पडत असल्याची शक्यताही व्यक्त केली आहे. वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच लावलेल्या पिंजऱ्यामुळे संभाव्य धोका टळला असून स्थानिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
Video: रांजणगाव MIDC परिसरात शिरला बिबट्या…
शिरूर तालुक्यात बिबट्यांसाठी कृत्रिम जंगल केले जाणार विकसीत; कोठे पाहा…
शिरुर तालुक्यात दोन जर्सी कालवडीवर बिबट्याचा हल्ला एक ठार, दुसरी गंभीर जखमी…
पुणे विमानतळावर प्रवाशांची गर्दी अन् अचानक आला बिबट्या…
Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…