आरोग्य

जास्त झोपत असाल तर वेळीच व्हा सावध

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी झोप पूर्ण होणं फार महत्वाचं आहे. जर दिवसभराच्या थकव्या नंतर पुरेशी झोप मिळाली नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. याच कारणाने एक्सपर्ट्स रोज कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप घेण्याचा सल्ला देत असतात. तुम्हाला किती तासांच्या झोपेची गरज आहे हे तुमच्या वयावर अवलंबून असतं. कारण वयानुसार झोपेची गरज बदलते. मात्र, जास्त झोपणं आरोग्यासाठी फार नुकसान कारक ठरू शकतं. जास्त झोपल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांचे शिकार होऊ शकता.

झोप पूर्ण झाल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतं. पण जास्त झोपाल तर तुम्हाला अजिबात फ्रेश वाटणार नाही. जर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त झोप येत असेल किंवा तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर यामागे काहीतरी कारण असू शकतं. हा हायपर सोमनियाचा संकेत असू शकतो.

काय आहे हायपरसोमनिया

या स्थितीमध्ये तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त झोप येते. रात्री पुरेशी झोप घेतल्या नंतरही दिवसाही व्यक्तीला झोप येते. तसेच सकाळी झोपेतून उठण्यात समस्या होते किंवा कधी कधी भ्रम होत असणंही हायपर सोमनियाचा संकेत आहे.

जास्त झोपल्याने होणारे आजार

जास्त झोपल्याने वजन वाढतं. त्याशिवाय हृदयरोग, स्ट्रोक आणि इतरही हृदयासंबंधी अनेक गंभीर समस्या होतात. जे लोक रात्री १० तासांपेक्षा जास्त झोपतात त्यांना टाइप २ डायबिटीसचा धोका ५४ टक्क्यांनी अधिक राहतो. जास्त झोपेमुळे डिप्रेशनची समस्या वाढते. याने सुस्ती आणि आळस जाणवतो ज्यामुळे कोणतंही काम करण्याची ईच्छा होत नाही.

शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता

सतत थकवा जाणवणे किंवा पुन्हा पुन्हा झोप येत असल्याने शरीरात व्हिटॅमिन्स कमी होतात. व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी ३, व्हिटॅमिन बी ५, बी ६, बी ९, बी १२, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी कमी होताता. या सगळ्यांमध्ये व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी सगळ्यात महत्वाचे आहेत.

वयानुसार शरीरात कमी होतं व्हिटॅमिन बी १२

जसजसं वय वाढतं शरीरात पोषक तत्व कमी होऊ लागतात, पण वाढत्या वयासोबत यांची गरज अधिक वाढत असते. एक्सपर्टनुसार, वाढत्या वयात अशा गोष्टींचं सेवन केलं पाहिजे ज्यामुळे शरीराला भरपूर व्हिटॅमिन बी १२ मिळेल. शरीरातील सगळ्या कोशिका योग्यपणे वाढण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ गरजेचं असतं.

जास्त झोप येणं टाळण्याचे उपाय

वेळेवर झोपण्याची आणि सकाळी वेळेत झोपेतून उठण्याची सवय लावा.

झोपण्याआधी कॅफीन आणि मद्यसेवन टाळा

बेडरूममध्ये अंधार करून झोपा

पौष्टिक आहार घ्या, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचं सेवन करा

नियमितपणे हलका व्यायाम करा

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

9 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

9 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

9 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

9 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

9 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

13 तास ago