Categories: आरोग्य

स्टूलवर-खुर्चीवर उभं राहून उंचावरची वस्तू काढताना पडलात तर करा या ३ गोष्टी

१) मदत घ्यायला हवी: एकतर वस्तू जास्त उंचावर असेल आणि आपल्याला ती काढणे शक्य नसेल तर सरळ थांबावे. घरात कामाला येणारे मदतनीस, घरातील इतर सदस्य यांची मदत घ्यायला हवी. ते शक्य नसेल तर आपण वर चढताना किमान घरातील कोणाला आपल्या मागे, आजुबाजूला उभे राहण्यास सांगावे. यामुळे चुकून तोल गेलाच तरी बाजूला कोणीतरी असल्याने अपघात होण्यापासून आपण वाचू शकतो.

२) साधने चांगली हवीत: वरच्या बाजुची वस्तू काढण्यासाठी शक्यतो चांगल्या प्रकारच्या शिडीचा उपयोग करावा. ती नसेल तर चांगला दणकट स्टूल वापरावा. घाईघाईत खुर्ची, एखाद्या कठड्यावर चढणे असे उपाय केले जातात. पण त्यामुळे तोल जाण्याची शक्यता जास्त असते. तसेच या गोष्टींची नियमित डागडुजी करुन घ्यायला हवी. त्यामुळे पडण्याची शक्यता कमी होते.

३) पडलोच तर: सगळी काळजी घेऊनही आपला तोल गेलाच तर मात्र झटपट उठण्याचा अट्टाहास करु नये. कारण एखादवेळी अशाप्रकारे पटकन हालचाल केल्याने दुखणे बळावण्याचीच शक्यता जास्त असते. शांतपणे उठण्याचा प्रयत्न करावा आणि घरात शक्य असतील ते प्रथमोपचार करुन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण लागलेला भाग तेव्हा दुखत नसला तरी नंतर मुकामार लागलेले ठिकाण दुखू शकते. एखादवेळी मार जास्त लागला असेल तर रक्ताची गाठ होण्याची शक्यता असते. डोक्यावर मार लागला तर ते दुखणे काही काळाने उद्भवते. म्हणून वेळच्या वेळी योग्य त्या उपाययोजना केलेल्या केव्हाही जास्त चांगल्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

11 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

15 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

15 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

15 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

15 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

15 तास ago