आरोग्य

वजन कमी करण्यासाठी ‘या’ फळाचा आहारात समावेश करा

ज्यांना वजन वेगाने कमी करण्याची इच्छा आहे. त्यांना आहारात फळांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गुणांमुळे वजन कमी होण्यास आणि नियंत्रणात राहण्यास मदत होते. थोडं पण कामाच वजन कमी करण्यासाठी फळे ठरतात. गुणकारी फायबर आणि व्हिटॅमिनमुळे वजन कमी होण्यास मदत कॅलरी कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

सध्याची व्यस्त जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याचा त्रास अनेकांना होतो. भारतात सध्या बहुतांश मध्यमवर्ग हा वजन वाढण्याच्या समस्येमुळे चिंताग्रस्त आहे आणि ते कमी कसं करता येईल, याची काळजी करत आहे. त्यासाठी अनेकजण जिम लावतात, डाएटिशनकडे जाऊन आपल्यासाठी योग्य आहार लिहून आणतात आणि इतरही अनेक प्रकाराने प्रयत्न करतात. या सर्व प्रयत्नांच्या जोडीला जर आहारात चांगल्या फळांचा समावेश केला, तर त्याचे योग्य परिणाम आपल्याला दिसू शकतात. फळांमध्ये व्हिटॅमिन, फायबर यासह अनेक पोषक घटक असतात, जे आपलं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. जाणून घेऊया, वजन कमी करण्यासाठी कुठली फळं फायदेशीर ठरतात, याविषयी.

सफरचंद: ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे, त्यांनी आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश करण्याची गरज आहे. सफरचंदात कमी कॅलरीज असतात आणि अधिक प्रमाणात मिनरल्स, प्रोटीन, अँटि ऑक्सिडंट्स् आणि फायबर असतं. सफरचंद खाण्यामुळे पचनशक्तीही सुधारते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

कलिंगड: जर तुम्हाला वजन कमी करायचंच असेल, तर कलिंगडासारखं दुसरं उपयुक्त फळ मिळणं कठीण आहे. कलिंगडात मोठ्या प्रमाणावर पाणी तर असतंच, त्याचबरोबर फायबर, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटिन, लायकोपीन यासारखे अनेक पोषक घटक असतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कलिंगडाचं ज्यूस पिणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं. त्याचप्रमाणे कलिंगड कापून खाणे हा पोट भरण्याचा आणि शरीरात कमीत कमी कॅलरीज सोडण्याचा उत्तम मार्ग ठरतो

पपई: वजन कमी करण्यासाठी पपई फारच गुणकारी मानली जाते. पपईत फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं.यामुळे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरात साठलेली चरबी वितळायलाही त्याची मदत होते. आपल्या डाएटमध्ये अधूनमधून पपईचा समावेश केला तर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात लवकर यश येण्याची शक्यता असते.

बेरी: बाजारात पाच वेगवेगळ्या प्रकारच्या बेरिज मिळतात. आपल्या जवळच्या बाजारात मिळणाऱ्या बेरिज आणून त्यांचं सेवन केल्यामुळेही वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना वेगाने यश येऊ शकतं. बेरिजचं नियमित सेवन केल्यामुळे हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, जळजळ यासारख्या त्रासांपासूनही सुटका होते. त्याचप्रमाणे यात मुबलक प्रमाणात अँटि ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर

शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…

8 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण

शिरूर  (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…

9 तास ago

प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबावाचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा

इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…

9 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…

11 तास ago

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

1 दिवस ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

2 दिवस ago