आरोग्य

शरीरातील आयर्न ची कमतरता

आयर्न हे शरीरासाठी खूप महत्वाचे असून शरीराला मजबूत ठेवण्याचे काम करते. ते शरीरातील हिमोग्लोबिन चा महत्वाचा घटक आहे. सामान्यतः पुरुषात आयर्न १३.५ ते १७.५ ग्रॅम असले पाहिजे, तर स्त्रियात १२.० ते १५.५ ग्रॅम असले पाहिजे. आयर्नलाच ‘ऍनिमिया’ असे देखील म्हटले जाते. जे शाकाहारी आणि विगन आहेत त्यांना आयर्न ची कमतरता जाणवतेच. कॅल्शियम सुद्धा आयर्न वर परिणाम करू शकतो. स्त्रियांना तर पिरियडमुळे देखील आयर्न ची कमतरता वाढते. गरोदरपणात देखील स्त्रियांना आयर्नची खूप गरज असते. तसेच डिलिव्हरी नंतर तर त्यांची आयर्नची कमतरता वाढते.

आयर्न कमी होण्याची लक्षणे

1) थकवा जाणवणे.

2) केसगळती होणे.

3) त्वचेचा रंग फिकट होणे.

4) रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे.

5) जीभ सुजणे आणि लाल होणे.

6) HB कमी होणे आणि त्यामुळे आयर्न च्या पेशी ह्या विकृत होऊ लागतात.

7) संसर्ग लगेच होणे.

आयर्न कमतरतेवरील उपाय

यासाठी आयर्नची तपासणी करावी लागते. त्यात हिमोग्लोबिन, रक्त तपासणी आणि हेमेटोक्राइट तपासणी करण्याची गरज असते. आयर्न असलेले सी फूड आहारात घेणे. तसेच आयर्न असलेले टॅबलेट आहेत त्याचा उपयोग करणे गरजेचे असते. तसेच डॉक्टरांच्या सल्याने औषध घ्यावीत. आयर्न कमतरता असणाऱ्यांनी दूध आणि दूधजन्य पदार्थ टाळले पाहिजेत. आयर्न कमतरतेच्या औषधांमुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. आहारात हिरव्या पालेभाज्या रोज खाव्यात. तसेच पेरू, चिक्कू, सफरचंद, बीट,आंबा ह्या फळात आयर्न भरपूर प्रमाणात असते. मसूर, मूग, मोड आलेले कडधान्य, नारळ, शेंगदाणे, तीळ, गुळ हे अवश्य आहारात घ्यावेत. तसेच मासे, अंडी, मटण हे हि आहारात घ्यावेत. या सगळ्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago