मुंबई: भारतीय संविधान दिनानिमित्त बुधवार (दि. २6) नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे ‘प्रजासत्ताक आभास का वास्तव’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध घटना तज्ज्ञ व विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे हे प्रमुख वक्ते आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व वक्ते ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार पद्मश्री कुमार केतकर आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून कार्यक्रमाचे सूत्र संचालन ॲड. भाऊसाहेब आजबे व ॲड. संदेश कोंडविलकर करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे संयोजक व समन्वयक विश्वास उटगी यांनी दिली आहे.
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…