पाणी पिण्यास विसरू नका. पाण्याव्यतिरिक्त इतर पेये पिण्यावर नियंत्रण आणा. या पेयांमुळे शरीरात जाणार्या कॅलरीजची संख्या वाढते आणि परिणामी वजन वाढते. भाज्यांचा रस, सूप यांचा आहारात समावेश करा. कधीतरी गोड खाण्यास हरकत नाही. मात्र त्यांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा. अशा पदार्था मध्ये अॅडेड सुगर मोठ्या प्रमाणात असते. नीट बसून खा. घाईघाईत खाल्ल्यास बऱ्याचदा जरुरी पेक्षा जास्त अन्न पोटात जाते.
खातेवेळी टीव्ही बघणे, वाचणे टाळा. त्यामुळे खाण्याकडे दुर्लक्ष होते. भोजनामध्ये हृदयासाठी चांगल्या असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. जेवणाची चव चांगली असणे महत्त्वाचे आहेच, मात्र त्यासाठी त्यातील फॅट्स वाढवणे मुळीच चांगले नाही. सायीच्या दुधाऐवजी साधे दूध प्या. चव वाढवण्यासाठी मिठाऐवजी मसाले वापरा. सॅच्युरेटेड फॅट्स खाण्यापेक्षा भाज्यांमधून मिळणारे फॅट्स खा. स्वयंपाकघरातील सगळे जंक फूड बाहेर काढा आणि तेथे कर्बोदके असणारी पेये आणि फायबर-रिच बिस्किटे, ताजा रस यांसारखे निरोगी रेडी-टु-ईट पदार्थ ठेवा. वेळी अवेळी खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा. दररोज रात्री दिवसभरात काय खाल्ले यावर एक नजर टाका. त्यातील किती पदार्थ खाणे गरजेचे होते हे स्वत:लाच विचारा.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…