आरोग्य

दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा, नसांनसांत भरेल ताकद-कंबरदुखी टळेल

कॅल्शियम हाडं आणि दातांच्या विकासासाठी फार महत्वाचा घटक आहे. नर्व्स सिस्टीमचे कामकाज चांगले चालण्यासाठी, ब्लड क्लोटींग, मांसपेशींचे संकुचन, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी कॅल्शियम हा महत्वाचा घटक आहे. दूधाव्यतिरिक्त कॅल्शियमने परीपूर्ण इतर खाद्यपदार्थ आहेत ज्याच्या सेवनानं हाडं आणि दातं मजबूत होण्यास मदत होत आणि तब्येतही चांगली राहते.

एक कप सुर्यफुलाच्या बियांमध्ये १०९ मिलीग्राम कॅल्शियम असते. या बिया मॅग्नेशियमने परिपूर्ण असतातत. ज्यामुळे शरीरातील नर्व्हस आणि मसल्स चांगले राहण्यास मदत होते. यात व्हिटामीन ई आणि कॉपर असते (Ref). ज्यामुळे स्ट्रेथ आणि फ्लेक्सिबिलिटी वाढते आणि या बियांच्या सेवनाने एक्स्ट्रा कॅलरीज इन्टेक टाळता येतो. २ कप चिरलेल्या केलमध्ये जवळपास १८० ग्रॅम कॅल्शियम असते. केलमध्ये एंटीऑक्सिडेंट्स असतात. ज्यात कमीत कमी कॅलरीज असतात. १०० ग्रॅम मध्ये ३५ कॅलरीज असतात.

एक औंस म्हणजेच जवळपास २३ बदामात ७६ मिलीग्राम कॅल्शियम असते. ब्राजील नट्स आणि हेजलनट्समध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.

एक औंस म्हणजे जवळपास २ चमचे चिया सिड्समध्ये १७९ मिलीग्राम कॅल्शियम असते. १ चमचा तिळाच्या बियांमध्ये ८८ मिलीग्राम कॅल्शियम असते.

१ चमचा खसखसच्या बियांमध्ये १२६ मिलीग्राम कॅल्शियम असते. एक कप पांढऱ्या डाळींमध्ये १६१ मिलीग्राम कॅल्शियम असते. एक कप काबुली चण्यांमध्ये ८० मिलीग्राम कॅल्शियम असते. एक कप शिजवलेल्या चवळीत २११ मिलीग्राम कॅल्शियम असते.

कॅल्शियमचा टोफू एक उत्तम स्त्रोत आहे,अर्धा कप टोफूमध्ये ८६१ मिलीग्राम कॅल्शियम असते. फोर्टिफाईड प्लांटबेस्ड दूध आणि ज्यूस, बदाम दूध, सोया दूध आणि ओट्स दूध हे कॅल्शियम फोर्टिफआईडपासून तयारे झालेले असतात.

फोर्टिफाईड संत्र्याचा रससुद्धा ३०० मिलीग्राम कॅल्शियम प्रदान करतो. संत्र्याचा रस प्यायल्यानं व्हिटामीन सी मिळते आणि इम्यूनिटी मजबूत राहते.

एक कप शिजवलेल्या पालकात २४५ मिलीग्राम कॅल्शियम असते. यासोबतच केल, कोलार्ड ग्रीन्स, बोक चोय या पानांमध्ये कॅल्शियम असते.

एक मोठ्या संत्रीमध्ये जवळपास ७४ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. एक ग्लास संत्र्याच्य रसात ३०० मिलीग्रॅम कॅल्शियम असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

11 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago