आरोग्य

चांगली झोप येण्यासाठी उपयुक्त टिप्स

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे थकवा आणि तणाव तर वाढतोच, पण त्याचा रोगप्रतिकारक शक्तीवर, स्मरणशक्तीवर आणि काम करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. हे टाळण्यासाठी किंवा यामध्ये सुधारणा करण्यासाठी काही टिप्स उपयुक्त ठरु शकतात.

झोपेची वेळ नक्की करा: झोपण्याची आणि ठराविक वेळेत उठण्याची सवय लावणं चांगली झोप येण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे ही वेळ विश्रांतीची आहे हे शरीराला समजण्यास मदत होते आणि मेंदूला आरामशीर स्थितीत येण्यास यामुळे मदत होते. आठवड्याच्या प्रत्येक दिवशी एकाच वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून शरीराचं नैसर्गिक घड्याळ योग्यरित्या कार्य करू शकेल.

स्क्रीन टाइम टाळा: झोपण्या पूर्वी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप इत्यादींचा अतिवापर टाळावा. या उपकरणांमधून उत्सर्जित होणारा निळा प्रकाश आपल्या झोपेमध्ये व्यत्यय आणतो आणि मेलाटोनिन (झोपेला प्रेरित करणारं हार्मोन) चं उत्पादन कमी करतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान ३० मिनिटं इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहा.

हलकं अन्न खा: रात्री हलकं आणि सहज पचणारं अन्न खाणं फायदेशीर आहे. जड अन्नामुळे पोटात गॅस, अपचन किंवा आम्लपित्त यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे झोपेमध्ये अडथळा येतो. झोपण्यापूर्वी जास्त तेलकट किंवा मसालेदार अन्न खाणं टाळावे आणि झोपण्याच्या दोन तास आधी जेवण करावे.

ध्यान किंवा प्राणायाम करा: ध्यान आणि प्राणायाम केवळ मानसिक शांतीच देत नाहीत, तर तणाव आणि चिंता देखील दूर करण्यासाठी मदत करतात. झोपण्यापूर्वी काही मिनिटं ध्यानधारणा किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचा व्यायाम केल्यानं मन शांत होतं आणि चांगली झोप येण्यास मदत होते. यामुळे मानसिक शांती तसंच शरीराला आराम मिळतो.

कोमट दूध किंवा हर्बल चहा प्या: झोपण्या पूर्वी एक ग्लास कोमट दूध पिणं फायदेशीर आहे. दुधामध्ये असलेले ट्रिप्टोफॅन अमिनो ॲसिड शरीरातील मेलाटोनिनची पातळी वाढवतं, ज्यामुळे चांगली झोप लागते. याशिवाय कॅमोमाइल सारखा हर्बल चहा देखील मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि झोप आणण्यासाठी उपयुक्त आहे.

आरामदायक वातावरण तयार करा: झोपण्या पूर्वी खोलीचं तापमान, प्रकाश आणि आवाज याकडे लक्ष द्या. चांगल्या झोपेसाठी आरामदायक आणि शांत वातावरण आवश्यक आहे. अंधार, योग्य तापमान आणि कमी आवाज झोपेची गुणवत्ता वाढवतात. शक्य असेल, तर आपण हलक्या सुगंधाचा वापर करा. ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यात मदत होते‌.

नकारात्मक विचारांपासून दूर रहा अनेक वेळा झोपण्या पूर्वी मनात नकारात्मक विचार येतात किंवा चिंता सतावते, ज्याचा झोपेवर परिणाम होतो. यासाठी दिवसभरातील चांगल्या गोष्टी डायरीत लिहू शकता, ज्यामुळे मन प्रसन्न आणि संतुलित राहील. दिवसभरात केलेल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यानं मनाला शांती मिळते आणि चांगली झोप येण्यास मदत होते.

व्यायामाची योग्य वेळ ठरवा: दिवसभरात केलेला व्यायाम शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतो, परंतु झोपण्यापूर्वी जास्त व्यायाम टाळावा. व्यायामामुळे ऊर्जा वाढते, ज्यामुळे झोप येण्यास त्रास होऊ शकतो. जर झोपण्यापूर्वी काही करायचे असेल तर लाइट स्ट्रेचिंग किंवा योग साधना करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

7 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

7 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

8 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

13 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

13 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

13 तास ago