न्हावरे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथे निमोणे-गुनाट रोडवर असलेल्या परफेक्ट एच. पी. पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या चार कामगारांनी मिळुन एकुण ९४ हजार ५२० रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत राजेश्री अनिल काळे (वय ४३) रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दि २१ जुलै २०२५ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असुन या प्रकरणी रामेश्वर हरिशचंद्र गर्गोंड (रा. खबरा, थाना देवरी, जि. रामसेन, मध्यप्रदेश), रमन सिताराम ठाकूर (रा. मदनपुर बरेली, नरसिंगपूर, मध्यप्रदेश), आकाश विक्रम ठाकूर (रा. सहजपुर ऊटकटा, जि. सागर,मध्यप्रदेश) व सोनू ठाकुर (पुर्ण नाव अज्ञात, रा. हाथीडोल, नमाखेडा, थाना देवरी, जि. रामसेन, मध्यप्रदेश) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेट्रोल पंपातुन चोरीस गेलेली रक्कम ही पेट्रोलपंपावर झालेली दैनिक कलेक्शन व उचल म्हणून ठेवलेली रोख रक्कम होती. आरोपींनी ती चोरी करुन पळ काढला. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार प्रताप टेंगले हे करत आहेत.
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…
मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…
Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…
नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…