आरोग्य

अपेंडीक्स म्हणजे काय

अपेंडीक्स हा शब्द टॉन्सिल प्रमाणेच आपल्या परिचयाचा झालेला असतो आणि ऑपरेशन करून काढून संदर्भात तो येतो, त्यामुळे वरील प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. अपेंडीक्स हा पचनसंस्थेचा एक भाग आहे. मोठ्या आतड्याचा बारीक शेपटी सारखा वा करंगळी प्रमाणे दिसणारा हा भाग मोठ्या आतड्याशी लहान आतडे जिथे जुळते त्याजवळ असतो. तसे पाहता मानवामध्ये हा अवयव निरुपयोगीच.

रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण करण्यास याचा उपयोग होतो. जिवाणूंना अटकाव करण्याच्या याच्या कार्यामुळे यास पोटातील टॉन्सिल असेही म्हणतात. गायी-म्हशी सारख्या गवत खाणाऱ्या प्राण्यांमध्ये अपेंडीक्स बरेच मोठे असते व सेल्यूलोज पचन त्यात होते. अपेंडीक्सच्या आतील पोकळीत अन्नकण अडकल्याने, पोटातील जंतांमुळे (बंद झाल्यास) त्यात जंतुसंसर्ग होऊन अपेंडीक्सला सूज येते. त्यास अपेंडीसायटीस असे म्हणतात. यात पोटात बेंबी खालील उजव्या भागात दुखते. ही वेदना तीव्र असते. सामान्यपणे उलटी सुद्धा होऊ शकते. पोटाचा तो भाग ताठर व दुखरा होतो. त्या व्यक्तीस बराच तापही असतो. त्यामुळे या व्याधीचे निदान झाल्यावर ते काढून टाकणे श्रेयस्कर ठरते. कारण असा त्रास रुग्णास वारंवार होऊ शकतो व त्याचा परिणाम म्हणून गंभीर गुंतागुंती होऊ शकतात.

परंतु पोट दुखत असल्यास अपेंडीसायटीस असेल, असा गैरसमज करून घेणे योग्य नाही. पोटात दुखण्याची बरीच कारणे आहेत. पोटातील जंत, आमांश अशी कारणे आपल्याकडे बहुतांशी आढळतात. आजकाल अपेंडिक्स काढण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. विनोदाने अपेंडिक्स शल्यचिकित्सक यांची रोजीरोटी म्हटले जाते. वैद्यकीय क्षेत्रातही धंदेवाईकपणा वाढत चालल्याने रुग्णाने असे ऑपरेशन करून घेण्यापूर्वी २-३ तज्ञांचा सल्ला घेतल्यास अनावश्यक शस्त्रक्रिया टळू शकेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

7 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago