आरोग्य

आपला संतूलित आहार कसा असावा

चांगला आहार हाच प्रमूख चांगल्या आरोग्याचा स्रोत आहे. मग त्या अन्नात अश्या गोष्टी असायला पाहिजे कि, ज्याने ते जेवण रूचकर व चवदार सोबत पौष्टिक, बलदायी, आरोग्यदायी असले पाहिजे. तेव्हा आपले महाराष्ट्रियन जेवण या अनुषंगाने अतिशय उत्तम स्रोत आहे. आपल्याला जेवणातून, पिष्टमय पदार्थ, प्रोटिन्स, स्निग्ध पदार्थ (वसा, फँटस् तूप, तेल, मेद) विटामिन्स, आणि क्षार मिळायला हवेत आणि आयुर्वेद म्हणते कि, जेवणांत गोड, आंबट, तिखट, खारट, कडू, तुरट, असे षड्रस मिळायला हवेत, तर ते परिपूर्ण जेवण असतं.

आपले मराठी जेवण शास्रशुद्ध असते. वरणातील डाळ प्रोटिन्स ची पूर्तता करते. यात घातलेला गूळ लोह देतो. तर, चिंचेचा कोळ लोह पचवायला मदत करतो. भात, पोळी, भाकरी, यांतून पिष्टमय पदार्थ मिळतात. त्यातून शरिराला उर्जा मिळते. वरणभातावर पडणारी साजूक तूपाची धार, स्निग्धता, देउन आतडे नरम ठेवते आणि अन्न पचवण्यास मदत करते. वेगवेगळ्या भाज्यांमधून मिळणारे मिनरल्स, आणि खनिजे पोषक ठरतात. थाळितले डावीकडचे पदार्थ मीठ, लिंबाची फोड, पंचाम्रूत, मिरचिचा ठेचा, थोडी कोशिंबिर, हे सर्व तोंडाला रस सुटून जेवण पचवतात.

लिंबू bit-C ची पूर्ति करते, तर हिरवी मिरची प्रतिकारशक्ती वाढवते, जंतूनाशक म्हणून. तीळ, शेंगदाणे, खोबरे, वंगण म्हणून उपयोगी ठरते, आणि स्निग्धता देते. अधे मध्ये जिभेला जिवंत करायला या डाव्या बाजूला असणाऱ्या पदार्थाचा उपयोग ठरतो. मिठ मात्र चवीचे खायचे. मसाले भातातले काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे शरिराला उर्जा देतात; तर मसाले सर्दी, कफ, विकारांवर अंकूश ठेवतात. पापडातला उडिद बळ देतो, ताकद, देतो. वाटितला मठ्ठा, ताक हे मन प्रसन्न करून मानसिक ताण कमी करते.

पातळ भाजीतले शेंगदाणे, खोबरे व फोडणीतला हिंग, अन्नाचे पचन करण्यास मदत करतो. सोबत मेतकूट म्हणजे अनेक डाळिंचा संगम, ज्यामुळे प्रोटिन मिळून ताकद वाढते. आणि सर्वात शेवटी गोड म्हणून शिरा, श्रीखंड, आमरस हे तृप्ती देउन, मानसिक ताण, कमी करते. मग मात्र हे आकंठ, जेवण पचावे म्हणून व त्यासाठी कॅल्शियम सहित अनेक द्रव्ये उपलब्ध व्हावित म्हणून (कात, चूना, सुपारी, लवंग, वेलची, खोबरे, गुलकंद) असे अनेक पदार्थ घातलेला त्रयोदशगुणी विडा हा खायला हवाच.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

3 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

9 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

9 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

10 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

10 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

10 तास ago