आरोग्य

आरोग्यासाठी वरदान पांढरे तीळ! नियमित खा, हाडं होतील मजबूत, पाठदुखी कंबर दुखीपासून होईल सुटका

थंडीचे दिवस सुरु झाले की, आपल्या आरोग्याच्या तक्रारीदेखील अधिक वाढतात. हिवाळ्यात आपल्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. त्यापैकी एक म्हणजे पांढरे तीळ. पांढऱ्या तीळाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. हे बहुगुणी आणि पौष्टिक खाद्यपदार्थ मानला जातो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि बी6 सारखे पोषकतत्व अधिक आढळतात. जे हाडांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

पांढऱ्या तिळाला नियमितपणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच हृदयविकार आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. पांढऱ्या तिळात फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे वजन कमी होते. यामुळे आपली पचनशक्ती देखील सुधारते. हिवाळ्यात आपल्याला गुडघेदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होतो. अशावेळी हाडं मजबूत करण्यासाठी नियमित रुपात तीळ खायला हवे. पांढऱ्या तीळात असणारे पोषक तत्व शरीरातील कॅल्शियम वाढवते. त्यासाठी रोज चमचाभर तीळ खायला हवे.

तिळाच्या तेलात व्हिटॅमिन ई आहे. जे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या सुरळीत करतात. सांधिवात, हाडांच्या तक्रारी असणाऱ्या लोकांनी तर आवर्जून तीळ खा. तसेच पांढरे तीळ हे सूपरफुड मानले जाते. मुठभर तीळ खाल्ल्याने आळस, कमकुवतपणा आणि थकवा दूर होतो. थंडीच्या दिवसात तुम्हाला सक्रिय राहण्यास मदत करतात. हाडांसोबतच केस, सेल्स मेंब्रेन आणि मेंदू चांगला राहातो. जर तुम्हालाही नुसते तीळ खायला आवडत नसतील तर या पद्धतीने ट्राय करुन पाहा.

पांढऱ्या तीळाचा रोल

पांढऱ्या तीळाचा रोल बनवण्यासाठी सर्वात आधी २५० ग्रॅम काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, खजूर, १५ ते २० अंजीर, ५० ग्रॅम खरबूजाच्या बिया, ५० ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया, २५ ग्रॅम पांढरे तीळ घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि अंजीर बारीक चिरून तुपात भाजून घ्या. तसेच सूर्यफुलाच्या बिया, खरबूजाच्या बिया आणि पांढरे तीळ भाजून घ्या. तयार मिश्रण थंड झाल्यानंतर बारीक करा. पॅनमध्ये तुप घालून गरम करा, त्यात गूळ घालून त्याचे पाक तयार करा. गूळ वितळला की, त्यात भाजलेला सुका मेवा आणि पांढरे तीळ घालून मिश्रण चांगले मिसळा. तयार मिश्रण कणकेसारखे मळून त्याचा पातळ रोल बनवा. त्याचे बारीक तुकडे करा किंवा लाडूसारखे वळवू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

1 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

14 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

14 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

14 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

14 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

14 तास ago