आरोग्य

आपल्याला पाच बोटे का असतात

खरं तर हा प्रश्न, आपल्याला पाचच बाटं का असतात, असा विचारायला जायला हवा. आपल्या हातांना तसंच पायांना पाच पाच बोटंच असतात. क्वचित काही जणांना एका किंवा दोन्ही हातांना वा पायांना सहावं बोट असतं. सहापेक्षा अधिक बोटं सहसा आढळत नाहीत; पण सहा बोटं असणंही अपवादात्मकच आहे. ती काही सामान्य स्थिती नाही.

बरं, फक्त मनुष्यप्राण्याच्या बाबतीतच ही स्थिती आहे असं नाही. कोंबड्या, उंदीर, मांजर, कुत्रा, वाघ, सिंह, वानर अनेक प्राण्यांच्या पायांना पाच बोटं असतात. खुरं असणाऱ्या जनावरांना पाचापेक्षा कमी बोटं असतात. म्हणजेच त्यांची एकापेक्षा अधिक बोटं जोडली जाऊन त्यांचं एकच एक जाडजूड बोट तयार होतं. त्यामुळे त्यांच्या बोटांची संख्या पाचापेक्षा अधिक होत नाही.

हे असं का होतं ? बोटांवर ही पाचाची मर्यादा का पडली ? असे प्रश्न मनात उमटायला लागतात. याला जसं उत्क्रांतीच्या प्रवाहाचं कारण आहे, तसंच सर्व प्राणीमात्रांच्या वाढीला कारणीभूत असणाऱ्या जनुकांची प्रणालीही जबाबदार आहे. उत्क्रांतीच्या प्रवाहात ज्या एखाद्या गुणधर्मामुळे जीवनकलह सुसह्य़ व्हायला त्या विशिष्ट पर्यावरणात तगून राहायला मदत होते, त्या गुणधर्माचा जतन होत.

झाडाच्या फांदीवरची पकड घट्ट होण्यासाठी किंवा हातात पकडलेल्या वस्तूवरची पकड घट्ट होण्यासाठी पाच बोटांची मदत होते, हे स्पष्ट झाल्यावर त्या गुणधर्माच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जनुकांचं संवर्धन झालं. उत्क्रांतीच्या ओघात प्राण्यांच्या नवनवीन प्रजाती उदयाला येताना या गुणधर्मात बदल होण्याचं टळल.

प्रत्येक प्राण्याची सुरुवात एकमेव फलित पेशीपासून होत असते. प्रथम त्या पेशीचं विभाजन होऊन दोन पेशी जन्माला येतात. याच प्रकारे केवळ विभाजन होऊन पेशींच्या संख्येत वाढ होते. या सर्व पेशी हुबेहुब एकसारख्या असतात. त्यानंतर विशिष्ट काळी या पेशींपासून वेगवेगळ्या अवयवांच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रचली जाते. ती होण्यासाठी त्याला कारक असणारी जनुकं कार्यान्वित होतात. त्यांना ‘होमिओबॉक्स जीन्स’ असं म्हणतात. त्याच्या प्रभावापोटी गर्भामधील अवयवांकुराचं पाच भागांमध्ये विभाजन होतं. त्यातील काही भाग शरीराच्या पुढच्या भागातील अवयवांच्या निर्मितीच्या कामाला लागतात, तर इतर पाठीमागील अवयवांच्या निर्मितीचं काम करायला लागतात.

या अवयवांकुराचे असे पाचच भाग होत असल्यामुळं मग हातापायांना फुटणाऱ्या बोटांच्या संख्येवरही मर्यादा येते. शिवाय अशी पाच बोटं त्यांच्यावर सोपवल्या जाणार्‍या पकडीच्या कामासाठी पर्याप्त असल्यामुळं त्यांच्या संकेत काही बदल करण्याचं प्रयोजनच पडलं नाही. जेव्हा कधी या जनुकांमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तनापायी पाचाहून अधिक बोटं तयार होतात त्या वेळीही ते अतिरिक्त बोट पाचांपैकी कोणत्या तरी एका बोटाला जोडलेलंच राहतं. हृतिक रोशनच्या डावीकडील हाताच्या अंगठ्याकडे पाहा म्हणजे याची खात्री पटेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

4 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 मिनिटे ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

15 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

19 मिनिटे ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

6 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

6 तास ago