तुळशीचे रोप बहुतेक लोकांच्या घरात लावलं जातं. तुळस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. विशेषतः उपाशी पोटी तुळशीची पानं खाण्याचे अनेक फायदे आहेत. बरेच लोक सकाळी उठल्यानंतर २-३ तुळशीची पानं चावून खातात, तर काही लोक त्यांचा वापर हर्बल टी बनवण्यासाठी करतात. मात्र तुळशीची पानं चावून खाणं हे योग्य नाही.
तुळशीची पानं का चावून खाऊ नयेत
मर्क्युरिक एसिड
तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात.या व्यतिरिक्त, त्यात र्क्यूरिक एसिड देखील असतं. हे एसिड दातांना नुकसान पोहोचवू शकतं. दातांचं संरक्षण करण्यासाठी इनॅमलचा एक थर असतो. या मर्क्युरिक एसिडमुळे तो थर कमकुवत होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुळशीची पाने चावून न खाण्याचा सल्ला दिला जातो.
आर्सेनिक
तुळशीच्या पानांमध्ये आर्सेनिक नावाचा घटक देखील असतो. त्याचे प्रमाण कमी आहे परंतु आर्सेनिक आपल्या लिव्हर आणि किडनीवर परिणाम करू शकतं. म्हणून, तुळशीची पानं मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
एसिडिक घटक
तुळशीमध्ये काही एसिडिक घटक देखील असतात. अशा परिस्थितीत, तुळस चावून खाल्ल्याने तोंडात तसेच पोटात एसिड निर्माण होऊ शकते. पोटाच्या समस्या टाळण्यासाठी तुळशीची पाने योग्य पद्धतीने खा.
तुळशीची पानं खाण्याची योग्य पद्धत कोणती
तुळशीची पानं तोडून ती नीट धुवून घ्या.
पानं थेट खाण्याऐवजी, चहा किंवा काढा बनवणं हा एक चांगला पर्याय आहे.
डोकेदुखी कमी करण्यासाठी तुळशीचं सेवन फायदेशीर ठरतं. तुळस ही डोकेदुखी तसेच इतर अनेक समस्यांसाठी गुणकारी असून रामबाण उपाय आहे. तुळशीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि पेन रिलीविंग प्रॉपर्टीज आहेत, ज्यामुळे तुम्हाला खूप आरामदायी वाटतं.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…