महाराष्ट्र

कानात हेडफोन घालून रुळ ओलांडणाऱ्या महिलेला वाचयला गेला, पण…

मोरिवली: स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तरुण पिढीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासोबतच हेडफोनचा वापरही वाढला आहे. अनेकजण काम करताना, प्रवास करताना किंवा अगदी रस्त्यावर चालतानाही हेडफोन लावून असतात. मात्र, अंबरनाथ येथे हेडफोनच्या वापरामुळे एका तरुणीचा आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मोरीवली गावाजवळ घडली आहे.

नेमक काय घडल

अंबरनाथ येथील मोरीवली गावात राहणारी 45 वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी नगर येथील 29 वर्षीय आतिष रमेश आंबेकर हे दोघे आनंदनगर एमआयडीसीतील एकाच कंपनीत काम करत होते. 20 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोघेही कामावरून घरी परतत होते. आतिष वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबीन रोडजवळील मोरीवली गावात गेला होता.

एकुलता एक मुलगा

वैशाली या हेडफोन लावून फोनवर बोलत रेल्वे रुळ ओलांडत होत्या. यावेळी रेल्वे येत असल्याचे आतिष आणि इतर काही लोकांनी पाहिले. त्यांनी वैशाली यांना हाक मारली, परंतु हेडफोनमुळे त्यांचे लक्ष नव्हते. वैशाली यांना वाचवण्यासाठी आतिष धावला, पण दुर्दैवाने रेल्वेने दोघांनाही धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. आतिष हा त्याच्या वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार होता आणि त्याच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली होती. त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वैशाली यांच्या पश्चात पती, एक मुलगी आणि 22 वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे पती रिक्षाचालक असून, यंदा मुलीचे लग्न करण्याची तयारी कुटुंब करत होते. अशा परिस्थितीत वैशाली यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार हरवला आहे. या घटनेनंतर मोरीवली गाव ते बी केबीन रोड या मार्गावर पादचारी पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मोरीवली गावचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी अनेकदा पादचारी पूल आणि बाजूला उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

4 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

23 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago