महाराष्ट्र

लग्न अवघ्या 11 दिवसांवर असताना तरुणाची गोळी झाडून हत्या…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरतल्या बायजीपुऱ्यामध्ये लग्न अवघ्या ११ दिवसांवर असलेल्या तरुणाचा पैशांच्या किरकोळ वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अल कुतूब हसीब हमद या ३० वर्षीय तरुणाचा खून झालेल्या तरुणाचे नाव तर हल्लेखोराचे नाव फयाज पटेल असल्याचं समजते. बुधवार (दि. 9) रोजी सायंकाळी ७: ३०च्या सुमारास न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरानगरमध्ये त्याच्यावर गोळीबार झाला. तसंच हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर पुन्हा मृत झालेल्या हमदला लाथाबुक्क्याही मारल्या.

अवघ्या ७,५०० रुपयांच्या वादातून केला खून

ही हत्या ७ हजार ५०० रुपयांच्या व्यवहारातून झाली असल्याची माहिती समजते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अल कुतूब हमद हा हुसेन कॉलनीत आईसोबत राहत होता. तो पैठणगेटच्या कपड्याच्या दुकानात काम करत होता. समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये काळ्या शर्टमध्ये असलेली व्यक्ती रस्त्यावरून जात असलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर गोळीबार करत असल्याचं दिसत आहे. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोराने चाऊस हमदच्या डोक्यात लाथही घातली. यानंतर रस्त्यावर उपस्थित असलेले नागरिक जखमी झालेल्या व्यक्तीजवळ जात आहेत. यातल्या एकाने हल्लेखोराला पकडून बाजूला आणल्याचंही दिसत आहे. एकाला मारण्याच्या उद्देशाने हा गोळीबार केला गेला, पण दुसरा जवळ असल्यामुळे तोही जखमी झाला. हल्लेखोरान चार राऊंड फायर केले. जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण एकाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाला.

गेल्या २० दिवसातली ही तिसरी घटना असून या घटनेने पुन्हा एकदा शहर हादरले आहे. गोळीझाडून तरुणाची हत्या केल्यानंतर हल्लेखोराने स्टेटसही टाकलं होतं. तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आयेगा असं स्टेटस त्याने ठेवलं होतं. गोळीबाराच्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

9 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago