महाराष्ट्र

लोकसभा निहाय दौरा आणि मंत्र्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार भरवणार; सुनिल तटकरे

मुंबई: लोकसभा निहाय राज्याचा दौरा आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे व नऊ मंत्र्यांचा जनता दरबार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्यव्यापी उभे राहणारे संघटन अशा वेगवेगळ्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुढच्या आठवड्यात बोलवणार आहे. आणि त्यानंतर पक्षाच्या कामाची व संघटनेची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने एक कालबद्ध कार्यक्रम ठेवणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

लोकसभानिहाय राज्याचा दौरा केला जाणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे करण्याबाबतही चर्चा झाली. याशिवाय राज्यात आमचे ९ मंत्री असून त्यांचा जनता दरबारसुध्दा राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पुढच्या आठवड्यात सुरु करण्यात येतील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago