महाराष्ट्र

हर घर तिरंगा; यंदाही स्वातंत्र्यदिनी घरावर फडकवता येणार तिरंगा…

‘या’ नियमांचे पालन करावे लागणार

संभाजीनगर: मागील वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता यंदाही स्वातंत्र्य दिनी हे अभियान राबविण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व सरपंच, ग्रामसेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्य सरकारने १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांनी आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले होते. यावेळी फक्त १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी तिरंगा ध्वज फडकावण्याचे जि. प. प्रशासनाने आवाहन केले आहे. यासाठी ज्या कुटुंबाची क्षमता नसेल, त्यांना ग्रामपंचायत स्वत:च्या निधीतून झेंड्यांचा पुरवठा करू शकते. यासाठी प्रशासनाकडून निधी तरतूद करण्यात आलेली नाही, असे जि. प. प्रशासनाने कळविले आहे.

तिरंगा फडकवतांना या नियमांचे पालन करा

ध्वजारोहण करताना तिरंग्याचा सन्मान राखावा.

कधीही फाटलेला अथवा खराब झालेला ध्वज लावू नये.

तिरंगा ध्वज उलटा फडकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

ध्वजारोहण करताना केशरी रंग सर्वात वर असावा.

राष्ट्रध्वज झुकलेला नसावा.

याशिवाय तिरंगा ध्वजाच्या आजूबाजूला इतर कोणताही ध्वज त्यापेक्षा उंच अथवा त्याच्याबरोबरीने नसावा.

ध्वजारोहण करताना त्याला कधीही जमीन अथवा पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नका.

मागील वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता यंदाही स्वातंत्र्य दिनी हे अभियान राबविण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व सरपंच, ग्रामसेवकांना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्य सरकारने १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांनी आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले होते. यावेळी फक्त १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी तिरंगा ध्वज फडकावण्याचे जि. प. प्रशासनाने आवाहन केले आहे. यासाठी ज्या कुटुंबाची क्षमता नसेल, त्यांना ग्रामपंचायत स्वत:च्या निधीतून झेंड्यांचा पुरवठा करू शकते. यासाठी प्रशासनाकडून निधी तरतूद करण्यात आलेली नाही, असे जि. प. प्रशासनाने कळविले आहे.

तिरंगा फडकवतांना या नियमांचे पालन करा

ध्वजारोहण करताना तिरंग्याचा सन्मान राखावा.

कधीही फाटलेला अथवा खराब झालेला ध्वज लावू नये.

तिरंगा ध्वज उलटा फडकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

ध्वजारोहण करताना केशरी रंग सर्वात वर असावा.

राष्ट्रध्वज झुकलेला नसावा.

याशिवाय तिरंगा ध्वजाच्या आजूबाजूला इतर कोणताही ध्वज त्यापेक्षा उंच अथवा त्याच्याबरोबरीने नसावा.

ध्वजारोहण करताना त्याला कधीही जमीन अथवा पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नका.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago