महाराष्ट्र

आणीबाणीला बाळासाहेब ठाकरे, विनोबा भावेंचेही समर्थन

मुंबई: इंदिराजी गांधी यांनी १९७५ साली तत्कालीन परिस्थितीमुळे आणीबाणीचा निर्णय घेतला होता. या आणीबाणीचे समर्थन विनोबा भावे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही समर्थन केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी इंदिराजी गांधी यांना त्यावेळी दोन पत्रे लिहिले होती, त्यात घालीन लोटांगण…हाच प्रकार आहे. ती पत्रे का लिहिली होती, हेही तपासले पाहिजे, असे म्हणत आणीबाणीत काही प्रशासकीय चुक्या झाल्या पण काही इष्टही झाले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

फ्रेंड्स ॲाफ डेमोक्रसी आयोजित फॅसिस्ट हुकुमशाही विरोधी कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. यावेळी शिवसेना नेते खा. संजय राऊत, माजी खा. कुमार केतकर, माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, श्वेता संजीव भट आदी उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, इंदिराजी गांधी यांनी १९७५ साली संविधानातील कलमानुसार आणीबाणीचा निर्णय घेतला होता आणि नंतर त्यांनी ती उठवली आणि मतचोरी न करता निवडणुका घेतल्या. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आणीबाणी ही चूक झाली हेही त्यांनी मान्य करत माफी मागितली आणि १९८० मध्ये देशातील जनतेने त्यांना पुन्हा बहुमताने विजयी केले. सोनियाजी, राहुलजी गांधी यांनीही नंतर आणीबाणीच्या काळात प्रशासनाच्या हातून काही चुका झाल्याचे मान्य केले आहे. आणीबाणी हा वेगळा अध्याय आहे. १९७१ च्या युद्धात लष्काराला तेल देणार नाही अशी भूमिका तेल कंपन्यांनी घेतली होती, त्यामुळे नंतर या तेल कंपन्या व काही बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

आणीबाणीने देशाला शिस्त लागली हे मात्र कोणी बोलत नाही. काळाबाजार, भ्रष्ट्राचार करण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती. आज मात्र याच्या नेमके उलट होत आहे. आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. भाजपाच्या हुकूमशाहीत ३००० कोटींचे जास्तीचे टेंडर खास उद्योगपतीला दिले होते ते सुप्रीम कोर्टाने रद्द केले. धारावी अदानीला विकली, विमानतळ दिले. मराठीवर अतिक्रण करण्याचे काम याच हुकूमशाहीने होत आहे. संस्कृती व सभ्यतेवर घाला घातला जात आहे तोही याच हुकूमशाहीने असेही सपकाळ म्हणाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यपत्र शिदोरी मासिकाचा आणीबाणीवरील विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

56 मिनिटे ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago