महाराष्ट्र

बिबट्यांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय…

मुंबईः पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या महिनाभरात बिबट्याने दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या या पट्ट्यातील नागरिक संतप्त झाले आहे. या नागरिकांनी सोमवारी पुणे-नाशिक महामार्ग तब्बल 16 तास रोखून धरला होता. यानंतर सरकारी पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना बिबट्यांची नसबंदी आणि स्थलांतराबाबत विचार सुरु असल्याचे संकेत दिले.

पुणे-नगर जिल्ह्यात 1300 बिबटे आहेत. आमची केंद्र सरकारसोबत याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांसोबत याबाबत आम्ही नंतर चर्चा करु. मंत्रालयातील आजच्या बैठकीला दिलीप वळसे पाटील आले होते. या बैठकीत शिरुर, जुन्नर, खेड, आंबेगाव भागातील काही बिबटे रेस्क्यू सेंटर येथे हलवण्याबाबत चर्चा झाली. आम्ही तशी मागणी करणार आहोत. तसेच बिबट्यांच्या नसबंदीचा कार्यक्रमही आखण्याचा विचार सुरु आहे. यासाठीही आम्ही केंद्र सरकारकडून परवानगी मागणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी मंत्रालयात बिबट्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेतली. यावेळी पुण्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन जुन्नर परिसरातून बिबट्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय वनमंत्र्यांनी घेतला. जुन्नर परिसरात बिबट्यांची संख्या जास्त आहे. अशात बिबटे इतर राज्यातील वनविभागांनी मागणी केल्यास त्यांना दिले जाणार. काही बिबटे वनताराला पाठवण्यात येतील. नरभक्षक बिबट्याला वनताराला पाठवण्याचे वनविभागाचे नियोजन आहे. यासाठी केंद्र सरकारसोबत लवकरच बैठक पार पडणार आहे. केंद्रासोबतच्या बैठकीनंतर बिबट्यांच्या स्थलांतराचा निर्णय होईल.

दरम्यान, वनविभागाचे ऑफिस आणि जीप जाळल्याप्रकरणी कोणालाही अटक न करण्याचे निर्देश यावेळी वनमंत्र्यांनी दिले. गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सध्याच्या परिस्थितीत न करण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जुन्नर परिसरात जवळपास 750 बिबटे आहेत. या बिबट्यांचे स्थलांतर करताना नेमक्या मार्गदर्शक सूचना कशा पाळल्या जाणार? यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

बिबट्याने मुलाला ओढल्यानंतर रक्ताच्या गुळण्या अन् डोळे पांढरे झाले…

शिरूर! बिबट्याच्या भीतीने ९ शाळा बंद; शार्पशुटर टीम पिंपरखेडमध्ये दाखल…

शिरूर! बिबट्याला शूट करण्याची दिली परवानगी…

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…

शिरूर तालुक्यात बिबट्याचा दहशतीचा कहर कायम; आठ दिवसांत दुसरा बळी…

शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

Video; कुत्राही मैत्रीला जागला…बिबट कुत्र्याच्या हल्ल्यात सहकारी कुत्र्याची मित्राला वाचविन्यासाठी धडपड…

Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

36 मिनिटे ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago