शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यापूर्वी 13 ऑक्टोबर 2025 रोजी शिरूरमध्ये 5 वर्षांची मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावली. रोहनच्या मृत्यूनंतर वडिलांनी न्यायाची मागणी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहनच्या वडिलांचे अश्रू थांबत नव्हते. आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी करत होते. त्यांनी सांगितले की, ‘बिबट्याने डोळ्यासमोर मुलाला शेतात ओढत नेलं. मी भरपूर प्रयत्न केले. पण बिबट्याने सोडले नाही. दोनदा माझ्यावर डरकाळी फोडून, हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासमोर बिबट्याने दोनदा त्याला तोंडाने ओढलं. मुलाच्या रक्ताच्या गुळण्या झाल्या, डोळे पांढरे झाले. माझ्या मुलाला ऊसाच्या शेतात आत ओढत नेलं. मला बिबट्या नको, मुलगा पाहिजे. मला न्याय पाहिजे, मला काही राजकारण नको. आमच्या गावात अनेक बिबट्या आहेत, रोज एक हल्ला होतो. एकही अधिकारी येथे येत नाही आणि दखल घेत नाही. आमच्या घरातील ही तिसरी घटना आहे.’
दरम्यान, पिंपरखेड येथे दहशत वाजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळाली आहे. यानंतर बिबट्याला ठार करण्यासाठी पाच वेगवेगळ्या टीम गावामध्ये दाखल झाल्या आहेत. या बिबट्याचा शोध घेत या बिबट्याला ठार केलं जाणार असल्याचं जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी सांगितले. दरम्यान, पिंपरखेड ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असून संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय पेटवून देत महामार्ग रोखून धरला आहे.
शिरूर! बिबट्याच्या भीतीने ९ शाळा बंद; शार्पशुटर टीम पिंपरखेडमध्ये दाखल…
शिरूर! बिबट्याला शूट करण्याची दिली परवानगी…
शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…
शिरूर तालुक्यात बिबट्याचा दहशतीचा कहर कायम; आठ दिवसांत दुसरा बळी…
शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी