मुख्य बातम्या

शिरूर! पिंपरखेड परिसरातील बिबट्याचा अखेर खात्मा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात सलग तीन निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्यानंतर नागरीक आक्रमक झाले होते. यानंतर ०४ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास एका बिबट्याला ठार करण्यात शार्पशूटर व वनविभागाला यश आले आहे. तब्बल वीस दिवसांपासून भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या या बिबट्याला वनविभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी (ता. ४) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचूक नेम साधून ठार मारण्यात आले.

१२ ऑक्टोबर रोजी ५ वर्षांच्या शिवन्या शैलेश बोंबे हिच्यावर, २२ ऑक्टोबर रोजी ८२ वर्षीय भागुबाई रंगनाथ जाधव यांच्यावर, तसेच २ नोव्हेंबर रोजी १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्यांचा मृत्यू घडवला होता. या सलग घटनांमुळे पिंपरखेड व परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेविरोधात नागरिकांचा संताप ओसंडून वाहत होता. बिबट्याच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी १२ आणि २२ ऑक्टोबर रोजी पंचतळे येथे बेल्हे-जेजुरी राज्यमार्ग रोखला, तर ३ नोव्हेंबर रोजी मंचर येथे पुणे-नाशिक महामार्ग तब्बल १८ तास ठप्प ठेवून तीव्र आंदोलन केले. संतप्त जमावाने पिंपरखेड येथील वनविभागाचे गस्ती वाहन आणि स्थानिक बेस कॅम्प इमारत पेटवून दिली होती.

पुणे विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांची तातडीने परवानगी घेऊन बिबट्याला जेरबंद अथवा ठार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुणे येथील “रेस्क्यू” संस्थेचे तज्ज्ञ डॉ. सात्विक पाठक (पशुवैद्यक), शार्पशूटर जुबिन पोस्टवाला व डॉ. प्रसाद दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले होते. दिवसभर परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून आणि थर्मल ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा शोध घेण्यात आला. ०४ रोजी रात्री १०:३० ला बिबट सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर दिसला. त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला, मात्र तो निष्फळ ठरला. चवताळलेल्या बिबट्याने प्रतिहल्ला करताच शार्पशूटरांनी अचूक नेम साधला आणि रात्री १०.३० वाजता बिबट ठार झाला. अंदाजे पाच ते सहा वर्षांचा असलेल्या या बिबट्याचा शेवट होताच परिसराने सुटकेचा निःश्वास सोडला. यानंतर पिंपरखेड येथील ग्रामस्थांना सदर बिबट्याचे शव दाखविण्यात आले. पश्चात त्याचे शवविच्छेदनासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले.

संबंधित कारवाई वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस व अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे तसेच रेस्क्यू संस्थेचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने यशस्वीरीत्या पार पडली. या धाडसी कारवाईनंतर पिंपरखेड येथील नागरिकांनी वनविभागाचे आभार मानले असून, जेवढे दिसतील तेवढे बिबटे ठार मारा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बिबट्यांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय…

बिबट्याने मुलाला ओढल्यानंतर रक्ताच्या गुळण्या अन् डोळे पांढरे झाले…

शिरूर! बिबट्याच्या भीतीने ९ शाळा बंद; शार्पशुटर टीम पिंपरखेडमध्ये दाखल…

शिरूर! बिबट्याला शूट करण्याची दिली परवानगी…

शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…

शिरूर तालुक्यात बिबट्याचा दहशतीचा कहर कायम; आठ दिवसांत दुसरा बळी…

शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

Video; कुत्राही मैत्रीला जागला…बिबट कुत्र्याच्या हल्ल्यात सहकारी कुत्र्याची मित्राला वाचविन्यासाठी धडपड…

Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

44 सेकंद ago

इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…

8 मिनिटे ago

पदविका विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय!

MSBTE कडून अत्याधुनिक ई-कंटेंट स्टुडिओ आणि संगणक केंद्राची उभारणी मुंबई.: पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या…

12 मिनिटे ago

महाराष्ट्राला जागतिक शिक्षण केंद्र बनविण्याचे ध्येय; उच्च शिक्षणात संशोधन, नवोपक्रम आणि रोजगारनिर्मितीवर भर

चंद्रकांतदादा पाटील; महाराष्ट्र उच्च शिक्षण शिखर परिषदेचे उद्घाटन मुंबई : उच्च शिक्षणाचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना…

16 मिनिटे ago

दुष्काळाच्या संकटात फळबागा वाचविण्यासाठी सरकारचा पुढाकार; केंद्राकडे विशेष मदतीचा प्रस्ताव पाठविणार; भरत गोगावले

मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील २.५ लाख हेक्टर फळबागांना दिलासा मिळण्याची शक्यता; शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदतीची…

20 मिनिटे ago

मलठणमध्ये शासकीय पाझर तलावाचा जलप्रवाह अडविल्याचा आरोप; सहा शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव!

मातीचे बांध आणि प्लास्टिक आच्छादनामुळे पाणी अडविल्याची तक्रार; विहिरींची पाणीपातळी खालावली, उभी पिके धोक्यात शिरूर…

25 मिनिटे ago