gondia-cobra
गोंदिया : एका सर्पमित्रासोबत हृदयद्रावक घटना घडली असून, कोब्रा जातीच्या सापाने दंश केल्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोब्राने दंश केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सुनील नागपुरे (वय ४४, रा. फुलचुर, गोंदिया) असे मृत्यू झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. त्यांनी आतापर्यंत शेकडो सापांना जीवनदान दिले आहे. पण, कोब्रा जातीच्या सापाने दंशामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
गोंदिया शहरालगत असलेल्या फुलचूर येथील सर्पमित्र सुनील नागपूर हे सापांना पकडून जीवनदान देण्याचे काम करत होते. पण सोमवारी रात्री गोंदियाच्या कारंजा येथे एका घरी साप निघाल्याची माहिती त्यांना मिळाली असता सापाचा रेस्क्यू करण्यासाठी गेले होते.कोब्रा सापाचा रेस्क्यू केल्यानंतर त्याला प्लास्टिकचे गोणीमध्ये टाकत असताना सुनील नागपुरे यांना सापाने दंश केला. साप गोणीतून बाहेर फिरला आणि त्यांच्या हाताला दंश केला. त्यांना तात्काळ गोंदिया शहरातील केटीएस रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या कुटुंबियांना शासना कडून आर्थिक मदत करावी, असे आवाहन स्थानिक नागरिक करत आहेत.
बापरे! किंग कोब्राने युवकाला केला दंश अन् जीव गेला सापाचा…
साप चावला अन् अंत्यसंस्कारावेळी उठून उभा राहिला…
थरारक Video: शौचालयास बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला…
Video: दारूचे व्यसन सोडवायला गेला अन् मिळाला खतरनाक ‘प्रसाद’…
Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…
Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…
शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…
मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…