छत्रपती संभाजीनगर : एका एसटी बसमध्ये दोन वृद्धांची फ्री स्टाईल हाणामारी झाली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. अनेकांना व्हिडिओ पाहून हसावं की रडावं हे समजत नाही.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसटी बसमध्ये ही घटना घडली आहे. सिल्लोड आगाराची बस हट्टी येथे गुरुवारी (ता. १३) जात असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चांदापूर गावालगत दोन जेष्ठ नागरिकांमध्ये एक मोफत प्रवासी वय 75 वरील आणि एक अर्धे भाडे असलेल्या जेष्ठ नागरिकात बुटाने हाणामारी झाली. विशेष म्हणजे चालकाच्या बाजूला असलेल्या बोनटवर एक जण बसलेला होता. त्यांच्या हाणामारीमुळे चालकाचे बसवरील लक्ष विचलित होऊ लागल्याने चालक इब्राहिम पठाण यांनी बस अवघड वळण रस्त्यावर थांबवून त्यांचे भांडण सोडविले. केवळ धक्का लागल्यामुळे झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
छ्त्रपती संभाजीनगरमधला व्हिडीओ, धावत्या बसमध्ये दोन वृद्धांची फिल्मी स्टाईल हाणामारी pic.twitter.com/5EyiiT4JWP
— VIRALबाबा (@viralmedia70) June 15, 2024
Video: पेट्रोल पंपावर फोनची रिंग वाजली आणि दुचाकी पेटली…
Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…
Video; शिरुर येथे मोठा अनर्थ टळला रस्ता दुभाजक ओलांडून मालवाहु कंटेनरची थेट सलुन दुकानाला धडक
Video: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी…