king cobra

साप चावला अन् अंत्यसंस्कारावेळी उठून उभा राहिला…

देश

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): अखनूरमधील विजय सिंह (वय २४) याला साप चावला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानतंर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण, अंत्यसंस्कारावेळी तो उठून उभा राहिल्यानंतर उपस्थितांना आनंदाचा धक्का बसला.

विजयला सर्पदंश झाल्याचं समजताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच विजय बेशुद्ध झाला. डॉक्टरांच्या टीमने अनेक प्रयत्न करूनही विजय शुद्धीवर आला नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अखेर, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबियांना मोठा धक्का बसला. पण, कुटुंबीय विजयचा मृतदेह घेऊन घरी पोहोचले आणि अंत्यसंस्काराच्या तयारीला लागले. विजयचा मृतदेह स्मशानभूमीत नेला. तिथे त्याच्या अंत्यसंस्काराचीही तयारी करण्यात आली होती. काहीच वेळात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.

अंत्यसंस्काराच्या काही वेळ अगोदर विजयच्या शरीरात काही हालचाल दिसू लागली आणि त्यानंतर विजय चितेवरून उठून उभा राहिला. त्याला पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक लोक याला चमत्कार म्हणू लागले आहेत. तर विजयचे कुटुंबीय डॉक्टरांवर नाराज आहेत. डॉक्टरांच्या या निष्काळजीपणामुळे आज आम्ही आमचा जिवंत मुलगा जाळला असता, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. आमच्या मुलाला वेळीच शुद्ध आली नसती तर त्याला जिवंत जाळले गेले असते. पण, संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

थरारक Video: शौचालयास बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला…

Video: दारूचे व्यसन सोडवायला गेला अन् मिळाला खतरनाक ‘प्रसाद’…

Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…

Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…

Video: पेट्रोल पंपावर फोनची रिंग वाजली आणि दुचाकी पेटली…

Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…