रांजणगाव गणपती (तेजस फडके) पिंपरखेड आणि जांबुतनंतर आता वाघाळे हे गावही बिबट्याच्या हल्ल्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. वाघाळे गावात काल (दि १३) रोजी येथील बाळासाहेब रमाजी थोरात यांच्या घराशेजारील गोठ्यात घुसलेल्या बिबट्याने तब्बल दहा शेळ्या ठार केल्या. परंतु माणसांची चाहूल लागताच तो क्षणात पसार झाला, पण गावात मात्र आरडाओरडा, गोंधळ आणि भीतीचे वातावरण पसरले.
वाघाळे गावात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत. काल गावात पालखी सोहळा सुरु असल्याने बहुतांश ग्रामस्थ गावात गेले होते. सुदैवाने महिलां व लहान मुलांचा गोठ्याजवळ वावर नव्हता अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला उसळला असुन ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा काल (दि १२) रोजी शिरुर तालुक्यात दौरा होता. एकीकडे वनमंत्री शिरुर तालुक्यात असताना दुसरीकडे वाघाळे गावात दिवसाढवळ्या बिबटयाने एका गोठ्यात शिरुन १० शेळ्यांवर हल्ला केला. वनमंत्री स्वतः तालुक्यात उपस्थित असतानाच दिवसाढवळ्या बिबट्याने हल्ला केल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभं राहील आहे.
त्यामुळे बिबटयाने ‘आमची जनावरं आणि माणसं खाण्यापेक्षा पिंपरखेड प्रमाणेच या भागातही बिबट्याला दिसताच गोळीबाराचे आदेश द्यावेत. अन्यथा माणसांचा बळी गेल्यावर प्रशासन जागं झालं तर उशीर होईल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असुन “बिबट्याचा बंदोबस्त करा अन वाघाळे गाव सुरक्षित करा” अन्यथा आम्हीच कारवाई करु” असा उघड इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर माजी जिल्हा परिषद शेखर पाचुंदकर पाटील यांनी वाघाळे गावात जाऊन बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच या दुर्दैवी घटनेबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
शिरुर; रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टला ‘ब’ वर्ग दर्जा; फटाके वाजवत आनंदोत्सव