पाबळ (सुनिल जिते) : शिरूर, जुन्नरसह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांत बिबट्याच्या उपद्रवाचे आणि मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत. मात्र, प्रशासन पातळीवर मात्र पुरेसे गांभीर्य नसल्याचेच दिसत आहे. वनविभागाच्या तोकड्या उपाययोजनांपुढे बिबट्या भारी ठरत असताना आणि गेल्या काही दिवसात जांबुत, पिंपरखेड सह तालुक्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
जुन्नर वनविभागांतर्गतही बिबट्याची समस्या आ वासून उभी असताना कामातील सुसूत्रतेबाबत सावळा गोंधळ दिसून येत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या महिन्यात जांबुत व पिपंरखेड मध्ये निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागला. बिबट्याच्या डरकाळ्यांमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील फलकेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक वासरू ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री (ता. १७ ) रोजी फलकेवाडी (कान्हूर मेसाई) शिवारात उघडकीस आली.
फलकेवाडी येथील शेतकरी बाळासाहेब चक्कर त्यांनी पशुधनासाठी गोठा तयार केला आहे. यामध्ये गाय व वासरू होत्या. सायंकाळी त्यांनी गाय व वासरे बांधून गेले. दरम्यान, रात्री 11.30 च्या सुमारास बिबट्याने आत प्रवेश करून हल्ला चढवला. यावेळी बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला. सदर प्रकार कुत्रे भुंकण्याच्या आवाजाने उघडकीस आला.
दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच वनरक्षक नारायण राठोड, हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती आहे. तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सध्या बिबटे जास्त आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे कमी अशी विरोधाभास आहे. त्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. एक बिबट्या पकडला तरी दुसऱ्या बिबट्याचे भय काही संपत नाही. तसेच बिबट्याचा माणसांवर हल्ला करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. एकंदरीत यावर शासनाने प्रभावी मार्ग काढून शेतकऱ्यांना भयमुक्त करणे गरजेचे आहे.
– बाळासाहेब चक्कर, शेतकरी कान्हूर मेसाई.
Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला
चिंताजनक! बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीला नेलं उचलून…
बिबट्याची दहशत! पिंपरखेडमधील महिलांनी स्वरक्षणासाठी गळ्यात घातला टोकदार खिळ्यांचा पट्टा…
शिरूर! निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांचा संयम लागला सुटू; बिबट्यांचा कळपच दिसला…
बिबट्याने मुलाला ओढल्यानंतर रक्ताच्या गुळण्या अन् डोळे पांढरे झाले…