अहिल्यानगर : बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत पाच वर्षांच्या मुलीला उचलून नेल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रियांका सुनील पवार (वय ५) असे बिबट्याने हल्ला केलेल्या मुलीचे नाव आहे. रियांका बुधवारी (ता. १२) सायंकाळी घरासमोर शेकोटीजवळ खेळत होती. यावेळी तिची आई देखील बाहेरच होती. घराजवळील तुरीच्या शेतातून आलेल्या बिबट्याने अचानक रियांकावर हल्ला केला आणि तिला उचलून नेले. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, तिचा शोध लागला नाही.
खारेकर्जुने येथील शेतावर काही कुटुंबे मजूर म्हणून वास्तव्यास आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता थंडी वाढल्याने कुटुंबातील सदस्य शेकोटीजवळ बसले होते. रियांका जवळच खेळत होती. त्याच वेळी शेजारील तुरीच्या शेतातून अचानक बिबट्या आला आणि क्षणार्धात तिला उचलून घेऊन गेला. कुटुंबीयांनी आरडाओरड केली व पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रियांकाचा काही शोध लागला नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने वस्तीवर धाव घेतली व शोधमोहीम सुरू केली. पोलिस आणि वन विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल होऊन रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवले. पण चिमुकलीचा अद्याप शोध लागला नाही. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा बसवण्याची मागणी केली आहे.
बिबट्याची दहशत! पिंपरखेडमधील महिलांनी स्वरक्षणासाठी गळ्यात घातला टोकदार खिळ्यांचा पट्टा…
शिरूर! पिंपरखेड परिसरातील बिबट्याचा अखेर खात्मा…
शिरूर! निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांचा संयम लागला सुटू; बिबट्यांचा कळपच दिसला…
बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या रास्ता रोको प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल
शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…