महाराष्ट्र

युद्धाच्या छायेत भारताला दिलासा; होर्मुझ पार करून एलपीजीचे दोन टँकर जहाजे देशात

गुजरात: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या चिंतेमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची दोन मोठी एलपीजी वाहक टँकर जहाजे – ‘शिवालिक’ आणि ‘नंदादेवी’ – इराणजवळील धोकादायक ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ सुरक्षितपणे पार करून भारताच्या किनाऱ्यावर पोहोचली आहेत.

‘शिवालिक’ हे जहाज सोमवारी (१६ मार्च २०२६) गुजरातमधील मुंद्रा बंदरात दाखल होण्याची शक्यता आहे, तर ‘नंदादेवी’ टँकर मंगळवारी (१७ मार्च) कांडला बंदरात पोहोचणार आहे. या दोन्ही जहाजांवर मिळून सुमारे ९२,७०० मेट्रिक टन एलपीजी गॅस असून प्रत्येक जहाजावर ४६ हजार टनांहून अधिक गॅस आहे. हा गॅस देशातील घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, भारतात दररोज सुमारे ८० हजार टन एलपीजीचा वापर होतो आणि दररोज सुमारे ७५ लाख सिलेंडर वापरले जातात. देशातील ३३ कोटी ग्राहकांपैकी सुमारे ८५ टक्के सिलेंडर स्वयंपाकासाठी वापरले जातात. त्यामुळे या ९२,७०० टन गॅसमुळे देशातील सुमारे सव्वा दिवसाची अतिरिक्त गरज पूर्ण होऊ शकते. युद्धाच्या काळात पुरवठा साखळी विस्कळीत झालेल्या परिस्थितीत हा साठा भारतीय स्वयंपाकघरांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

दरम्यान, ‘शिवालिक’ आणि ‘नंदादेवी’ ही जहाजे सुरक्षित बाहेर पडल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला अडकलेल्या ६ एलपीजी आणि १ एलएनजी टँकरला भारतात आणण्यासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. सध्या होर्मुझ परिसरात भारताची २२ जहाजे असून त्यावर ६११ भारतीय खलाशी आहेत. भारत प्रामुख्याने कतार, कुवेत आणि सौदी अरेबियाकडून गॅस आयात करतो. हे टँकर्स इराणच्या लष्करी देखरेखीखाली असलेल्या भागात असले तरी ते भारताचे असल्यामुळे इराणने त्यांना सोडण्याची परवानगी दिली आहे.

दरम्यान, भारत सरकार आणि इराण यांच्यात जहाजांच्या सुरक्षिततेसाठी उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. अडकलेले ६ टँकर्स सुरक्षितपणे भारताच्या दिशेने रवाना झाल्यास देशातील गॅस साठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने नागरिकांना घाबरून ‘पॅनिक बुकिंग’ करू नये, असे आवाहन केले आहे. देशात सध्या पुरेसा गॅस साठा उपलब्ध असून केवळ आवश्यक असल्यासच सिलेंडर बुक करावा, असे सहसचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच काळाबाजार रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये छापेमारीही सुरू करण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

23 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

23 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago