महाराष्ट्र

तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गडावर अन्नधान्य पुरवणारा वंजारी समाज आहे. दोष एका व्यक्तीचा असेल तर त्याला फाशी द्या; पण त्या आधारावर संपूर्ण समाजाला दोषी ठरवणे चुकीचे आहे. मी चुकलो तर मला कधीच माफ करू नका. तो विषय धनंजय मुंडेपर्यंत असावा, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ठाण्यात व्यक्त केली.

ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (ता. २७) पार पडले. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय मुंडे आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे येणार होत्या; पण भाऊ चालला आहे, माझ्या वतीने शुभेच्छा दे, असा त्यांचा निरोप सुरुवातीलाच मुंडे यांनी दिला. त्यानंतर त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनातील संघर्षाला उजाळा दिला.

गोपीनाथ मुंडे हे द्रष्‍टे होते. त्यांनी त्या वेळी आपल्याला बाजूला केले नसते तर आज मंत्रिमंडळात बहीण-भाऊ एकत्र बसले नसते, असे धनंजय मुंडे म्हणाले. या वेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय वातावरण आणि हत्याकांडानंतर होणाऱ्या टीकेलाही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, की राजकीय व्यक्ती म्हणून सर्व टीका स्वीकारल्या आहेत. मी चुकलो तर मला कधीच माफ करू नका. तो विषय धनंजय मुंडेपर्यंत असावा. त्याचा जातीपर्यंत संबंध लावू नये. दोनशे दिवसांत आपल्यासह संपूर्ण जिल्हा बदनाम का करावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दोन वेळा वाचलो

दोनशे दिवसांत दोन वेळा मरता-मरता वाचलो, ही गोष्ट केवळ डॉ. लहाने यांना माहीत आहे, असेही मुंडे या वेळी म्हणाले. मी ज्या समाजात जन्माला आलो त्याचा मला निश्चित अभिमान आहे. अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेचा नंबर आठवतो, यापेक्षा दुसरे काय हवे. मंत्रिपदाला काय चाटायचे आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

11 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

14 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

14 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

15 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

15 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

15 तास ago